Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या ग्राहकाची लूट,जिल्हा पुरवठा अधिकारी मात्र गाढ झोपेत



     प्रतिनिधी....मनोज जाधव 


 उमरगा येथील पेट्रोल पंपावर घडला धक्कादायक प्रकार...


   हाती आलेल्या माहितीनुसार उमरगा येथील जिओ  बीपी रिलायन्स पेट्रोल पंपावर उमरगा येथील स्थानिक चे रहिवासी सादिक भाई यांच्या KIA seltos या गाडीमध्ये त्यांनी आज डिझेल टाकले परंतु त्यांची यामध्ये फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले कारण त्यांच्या गाडीची डिझेल टाकी ही 50 लिटर क्षमता असलेली आहे परंतु त्या पंपावर मात्र त्याच टाकीमध्ये 56 लिटर डिझेल टाकण्यात आले यावरून त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले...


     आणखीन विशेष म्हणजे 50 लिटर क्षमतेच्या टाकीमध्ये 56 लिटर डिझेल पंप मालकाकडून भरले जाऊनही त्या टाकीमध्ये आणखीन दहा ते बारा लिटर डिझेल बसेल एवढी टाकी रिकामी होती याचा अर्थ त्यांची खूप मोठी फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले...


    नागरिकात संतापाची लाट...


     सदरच्या घटनेमुळे स्थानिक वाहनधारकांमध्ये संतापाची लाट आली असून सदरील पंप मालकाकडून खूप मोठ्या प्रमाणात जनतेची लुबाडणूक होत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे...



      सत्यमेव जयते न्यूज चॅनलचे काही प्रश्न...


1... पेट्रोल पंपाचे कॅलिब्रेशन नियमित तपासले जाते का ?


2... जिल्हा प्रशासन संपूर्ण जिल्ह्यातील पेट्रोल पंपाची नियमित तपासणी करते का ? 


3... सदरील पेट्रोल पंपावर कार्यवाही होणार का ?


4...जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय करतात ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या