Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जीवनाचा सार परिश्रमात - प्राचार्य जयप्रकाश कोळगे


 जीवनाचा सार परिश्रमात - प्राचार्य जयप्रकाश कोळगे   

      रुईभर :-दि 22 जुलै रोजी परिश्रमामुळे आपले ध्येय साध्य होतात. कोणत्याही क्षणी आपल्यावर संकट येईल हे लक्षात घेऊन आपण जीवनात सतर्क राहतो तसेच एखादे ध्येय पूर्ण करायचे असेल तर कठीण परिश्रम महत्त्वाचे आहे. ज्यांना परिश्रम करण्याची सवय आहे त्यांचे जीवन आनंदात जाते म्हणून जीवनाचा सार परिश्रमात आहे असे प्रतिपादन  जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुईभर येथे प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी विद्यालयाचा माजी विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षा द्वारे महसूल विभागात महसूल सहाय्यक या पदा साठी नियुक्ती झाल्यामुळे प्रतिक नागनाथ कांबळे यांचा सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.

          ते पुढे म्हणाले की याच विद्यालयात प्रतीक व त्याच्या वडिलांनी शिक्षण घेतले आहे. ते या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. परिश्रमातूनच सर्व काही मिळवता येते. विद्यालयात असे कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आयोजित केले जातात. आपणही यापासून प्रेरणा घेऊन उच्च पदावर विराजमान व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

         कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रतिक कांबळे यांच्या वडीलाचेही फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

          सत्कारमूर्ती प्रतीक कांबळे यांनी ही मनोगत व्यक्त करताना म्हणाले की जीवनात संगत महत्त्वाची आहे. माझ्यासोबत जे सहकारी होते ते ही आज कोणत्या ना कोणत्या पदावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या सोबतीने मी हे ध्येय ठेवून सलग तीन वर्ष परिश्रम घेऊन हे यश संपादन केले आहे. माझ्या कुटुंबात एकही सरकारी नोकरदार नाही म्हणून मी होण्याचे ठरवले. शेवट अथक परिश्रम घेऊन हे यश संपादन केले. या विद्यालयाने मला बरेच काही दिले त्यांची देन मी संपादन करून माझे ध्येय गाठले. तसेच आपण शाळेतील प्रत्येक गोष्ट आत्मसात करून आपले जीवन उज्वल बनवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

    याप्रसंगी माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे ,शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.   

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गणेश शेटे तर आभार  प्रा प्रशांत कोळगे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या