Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भाजप तालुका सरचिटणीस काका शेलार यांचा सत्कार


 

         प्रतिनिधी...मनोज जाधव 

देवळाली : भारतीय जनता पार्टी धाराशिव तालुका सरचिटणीसपदी नुकतीच निवड झालेल्या काका शेलार यांचा तुळजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



ही गौरवपूर्ण क्षण देवळाली येथे ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्ताने पार पडला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काका शेलार यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले.

या वेळी आमदार पाटील यांनी शेलार यांचे पक्षासाठीचे योगदान आणि संघटन कौशल्य याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तालुका स्तरावर पक्ष अधिक बळकट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमास भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराने परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

                    

           नवनियुक्त तालुका उपाध्यक्ष हरी भिंगडे 

     या वेळी भारतीय जनता पार्टी किसान सेलचे प्रदेश सचिव रामदास अण्णा कोळगे तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील भाजपाचे तालुका अध्यक्ष राजभाऊ पाटील तसेच नवनियुक्त तालुका उपाध्यक्ष हरी भिंगडे,रमण आगळे महेश लांडगे यांची उपस्थिती होती 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या