प्रतिनिधी....अमर आगळे...
धाराशिव (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी तालुक्यातील बरमगाव बू येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने क्रांती चौकाचे भव्य उद्घाटन व शाहीर प्रभाकर आगळे यांचा शाहिरी जलसा आयोजित केला जाणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात दि. 01 ऑगस्ट रोजी सकाळी प्रतिमा पूजनाने होणार असून त्यानंतर ठीक सकाळी 9 वाजता शाहीर प्रभाकर आगळे यांच्या सशक्त सादरीकरणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित पोवाडे, भीमगीते आणि सामाजिक संदेश देणारे शाहिरी कलाविष्कार सादर केले जाणार आहेत....
कार्यक्रमाचे आयोजन जय लहुजी प्रतिष्ठान, बरमगाव बू यांच्या वतीने करण्यात आले असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी सर्व नागरिकांना केले आहे.
कार्यक्रम स्थळ: क्रांती चौक, बरमगाव बू
दिनांक: 01 ऑगस्ट 2025
वेळ: सकाळी 9.00 वा.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर होणार असून, सर्व स्तरातील नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन संस्कृतीचा आणि लोककलेचा आनंद घ्यावा, असे आयोजकांचे म्हणणे आहे.
0 टिप्पण्या