प्रतिनिधी....मनोज जाधव
हरित धाराशिव अभियानांतर्गत धाराशिव तालुक्यातील वृक्ष लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रात पुढील दोन दिवसांत वृक्ष लागवडची पूर्व तयारी करून घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी, धाराशिव श्री ओंकार देशमुख सर यांनी केले.
धाराशिव तालुका वृक्ष लागवडीचे संपर्क नोडल अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री ओंकार देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन विभाग सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे सोमवारी (दि.30 जून) हरित धाराशिव अभियानांतर्गत १९ जुलै रोजी कराव्याच्या वृक्ष लागवड मोहिमेची पूर्व तयारी आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी तहसीलदार डॉ मृणाल जाधव मॅडम, गटविकास अधिकारी संतोष नलवडे, तालुका कृषी अधिकारी एस पी जाधव, गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद, वन विभाग बालाजी मुदाले व सामाजिक वनीकरण विभाग दिपक गांधले, तालुक्यातील इतर यंत्रणा प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना श्री ओंकार देशमुख सर म्हणाले की,
ही वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे वृक्षप्रेमी, सेवाभावी संस्था, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, बचत गट सदस्य, एनजीओ या सर्वांना यात सहभागी करून घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री ओंकार देशमुख यांनी उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, सरपंच यांच्याकडून गावनिहाय आढावा घेतला. यावेळी तहसीलदार डॉ मृणाल जाधव मॅडम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त लोक सहभागी व्हावेत अन् त्यांनी वृक्ष लागवडीसाठी स्वयंसेवक म्हणून ग्रामपंचायतकडे नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या बैठकीस सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या