Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

नेट बॉल स्पर्धेत जयप्रकाश विद्यालयाचा जिल्हास्तर स्पर्धेत प्रथम क्रमांक ...

 


      प्रतिनिधी....मनोज जाधव 


        रुईभर :- दि 10 सप्टेंबर 2025 रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुईभर येथे जिल्हास्तर नेट बॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विजयी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे होते.

         क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव व धाराशिव जिल्हा नेट बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय नेट बॉल स्पर्धेत सन 2025-26 वर्षाकरिता 8 व 9 सप्टेंबर रोजी तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव या ठिकाणी या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत विद्यालयातील 19 वर्ष वयोगटातील मुलाच्या संघाचा नेट बॉल स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक, 19 वर्ष वयोगटातील मुलीच्या संघाचा द्वितीय क्रमांक तर 14 वर्ष वयोगटात मुलीच्या संघाचा तृतीय क्रमांक आला आहे. या सर्व खेळाडूंचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

            या सर्व खेळाडूंना प्राचार्य जयप्रकाश कोळगे, प्रा प्रशांत कोळगे श्री अश्विनकुमार पवार या क्रीडा शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

           याप्रसंगी माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.   

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन कांबळे यांनी तर आभार प्रा नानासाहेब पवार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या