शशिकांत मुळे यांची प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या संपर्कप्रमुखपदी निवड
तामलवाडी प्रहार संघटनेच्या वतीने मुळे यांचा सत्कार
तुळजापूर – (प्रतिनिधी)...सचिन शिंदे
प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या तुळजापूर, उमरगा व लोहारा तालुक्यांच्या संपर्कप्रमुखपदी शशिकांत मुळे यांची नियुक्ती करण्यात आल्याने तामलवाडी प्रहार संघटनेच्या वतीने शशीकांत मुळे यांचा फेटा,पुष्पहार व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रहार संघटनेचे जुने सहकारी असलेले शशीकांत मुळे यांनी पुन्हा संघटनेत प्रवेश करुन संघटनेला गती दिली असून जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या आदेशाने शशीकांत मुळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. शशीकांत मुळे यांच्यावर तुळजापूर, उमरगा लोहारा या तीन तालुक्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीप्रसंगी जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्षमहेश माळी, तुळजापूर तालुका समन्वयक कालू जाधव, धाराशिव तालुका सचिव संजय कारभारी,कार्याध्यक्ष तडवळे शाखा भगवान होगले,धाराशिव तालुका उपाध्यक्ष दत्ता पवार अभिमान सगट यांच्यासह संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
शशीकांत मुळे यांची तीन तालुक्यांच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी दिल्याने तामलवाडी प्रहार संघटनेच्या वतीने शशीकांत मुळे यांचा फेटा, पुष्पहार शाल व श्रीफळ देऊन तसेच पेढा भरवुन यथोचित सन्मान करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तालुकाध्यक्ष मारुती पाटील, तालुका संघटक सचिन शिंदे, शशीकांत गायकवाड, दशरथ भाकरे, सांगवी मार्डीचे बाळासाहेब बागल, अभिमान सगट, ओंकार मुळे आदी उपस्थित होते.
संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार - मुळे
---------------------------------------------
निवडीनंतर शशिकांत मुळे यांनी विश्वास व्यक्त केला की, संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून या पदाला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.



0 टिप्पण्या