तामलवाडी - ( प्रतिनिधी) सचिन शिंदे
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील (तेरणा व्हेली केमीकल आणि फर्टिलायझर व महीन्द्रा काॅर्प सायन्सेस) अशा दोन नावांनी सुरू असलेला बोगस खतनिर्मितीचा कारखाना जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार तीन महीन्यासाठी बंद करण्यात आला असुन सदरील कारखान्याने आजतागायत ग्रामपंचायतीस कुठल्याही कराचा एक रुपयाही भरणा केलेला नाही. सदरील कारखान्यांकडुन कराची वसुली करावी व कारखाना कायमस्वरूपी बंद करावा आशा आशयाचे लेखी निवेदन सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव गायकवाड यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे सादर केले आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील गट नं ३९९ येथे महीन्द्रा काॅर्प सायन्सेस तसेच तेरणा व्हेली केमीकल आणि फर्टिलायझर या दोन नावाने एका पत्र्याच्या शेडमध्ये काही अधिकारी यांना हाताशी धरून बोगस खतनिर्मितीचा कारखाना व सदरील खताची विक्री जोमात सुरू होती.ऑगस्ट महीन्यांमध्ये जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे लेखी निवेदन सादर करुन कारखान्यातील जवळपास १२ हजार ४४५ बोगस खताच्या गोण्या जप्त करण्यात आल्या असुन त्याची किंमत जवळपास १ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती संबंधित अधिकार यांच्याकडुन मिळाली. सदरील खतांचे नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजी नगर येथे पाठवण्यात आले होते. सदरील खत हे बोगस असल्याचे निष्पन्न झाले असुन सदरील कारखाना बंद करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे आजही त्या कारखान्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात नाही. ज्या ठिकाणी हा बोगस खताचा कारखाना आहे त्या सदरील शेतीची नोंद आजही तलाठी सज्जा येथेच आहे. परंतु त्या जागेचे एन ए सन २०२३ रोजी झाल्याचे खात्रीलायक माहीती मिळाली आहे. जर २०२३ रोजी सदरील जागेचे एन ए झाले असेल तर मग ग्रामपंचायत कार्यालयास आजतागायत कराचा भरणा का? करण्यात आला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेरणा व्हेली केमीकल आणि फर्टिलायझर व महीन्द्रा काॅर्प सायन्सेस या दोन नावाने बोगस खतनिर्मिती व विक्री करुन हजारो शेतकर्यांनी फसवणूक करणार्या संबंधित कारखान्यांकडुन कराची वसुली करावी व हा बोगस खतनिर्मितीचा कारखाना कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश द्यावेत व त्याची एक प्रत तक्रारदाराला देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव गायकवाड यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
तक्रारदारास अद्यापही अहवालाची प्रत मिळाली नाही.
---------------------------------------------
तामलवाडी येथील तो बोगस खतनिर्मितीचा कारखाना जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आला असुन सदरील खत हे बोगस असल्याचे निष्पन्न झाले असुन कारखान्यांमध्ये असलेल्या १२ हजार ४४५ बोगस खताच्या गोण्या किमंत जवळपास १ कोटींपेक्षा जास्त कारखान्यातच असल्याची माहिती संबंधित अधिकारी यांच्याकडून मिळाली असुन कारखान्यांमध्ये धाड टाकल्यापासुन ते कारखाना बंद करण्याच्या प्रक्रीयेपर्यंतचा कुठल्याही अहवालाची प्रत अद्यापपर्यंत मिळाली नसल्याचे सर्जेराव गायकवाड यांनी सांगितले.
तो बोगस खतनिर्मितीचा कारखाना कायमस्वरूपी बंद करावा
---------------------------------------------
बोगस खतनिर्मिती करुन शेतकर्यांचे अतोनात नुकसान करुन शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवणारा हा तेरणा व्हेली केमीकल आणि फर्टिलायझर व महीन्द्रा काॅर्प सायन्सेस या दोन नावाने असलेला कारखाना कायमस्वरूपी बंद करुन आस्मानी संकटाचा सामना करत असलेल्या राज्यातील शेतकर्यांनी वाचवावे अशी मागणी सर्जेराव गायकवाड यांनी केली आहे.
मा राज्यपाल व केंद्रीय कृषिमंत्री यांना देणार निवेदन
---------------------------------------------
तामलवाडी येथील तेरणा व्हेली केमीकल आणि फर्टिलायझर व महीन्द्रा काॅर्प सायन्सेस या दोन नावाने बोगस खतनिर्मिती व विक्री करणारा कारखाना कायमस्वरूपी बंद न झाल्यास शेतकर्यांचे अतोनात नुकसान करणारा हा कारखाना कायमस्वरूपी बंद करण्यासाठी मा राज्यपाल साहेब व केंद्रीय कृषिमंत्री साहेब यांच्याकडे पुराव्यासह लेखी निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव गायकवाड यांनी बोलताना सांगितले.
यावर आता धाराशिवचे जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक तामलवाडी येथील तो बोगस खतनिर्मितीचा कारखाना कायमस्वरूपी बंद करून शेतकऱ्यांना दिलासा देणार का? हे पहावे लागणार आहे.



0 टिप्पण्या