Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

संस्कारक्षम बनण्यासाठी वैचारिक परिवर्तन महत्त्वाचे - मा श्री प्रकाश बोधले महाराज ( राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ )


    संस्कारक्षम बनण्यासाठी वैचारिक परिवर्तन महत्त्वाचे - मा श्री प्रकाश बोधले महाराज ( राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ )
        रुईभर : - दि. 10 ऑक्टोबर रोजी - भारत देश समृद्ध करण्यासाठी व नवीन पिढी निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न होत असतात. कोणतेही कार्य करण्यासाठी उद्देश चांगला असला पाहिजे म्हणजे चांगले कार्य होत असते. उद्देश निर्मळ असेल तर त्या कार्याला भगवान रुपी आशीर्वाद भेटतात. सर्वांनी चांगले विचार स्वीकारले पाहिजेत त्यातूनच चांगले ज्ञान, चांगली शिक्षा आपल्याला आत्मसात करता येते. ज्ञान आणि शिक्षणातूनच आपल्याला संस्कारक्षम बनता येते. प्रत्येक कार्य करताना चांगल्याच कार्याची निवड करणे आवश्यक आहे. आपल्या विचारातून चांगले कार्य घडते हे कार्य घडण्यासाठी वैचारिक परिवर्तन महत्त्वाचे असते. वैचारिक परिवर्तनातूनच संस्कारक्षम बनत असतो. चांगले संस्कारच आपल्या जीवनाला आकार देत असतात असे प्रतिपादन जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे डॉ आंबेडकर बालविकास शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान गुलाबगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त मा श्री प्रकाश बोधले महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ,अखिल भारतीय वारकरी मंडळ ) बोलत होते.
          ते पुढे म्हणाले की या शिक्षण संकुलात येण्याची आस राहते. त्याचे कारण म्हणजे या ठिकाणी होणारे कार्य महान आहे. शिक्षण क्षेत्रातील महान कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्काचा योग मी सोडू शकत नव्हतो म्हणून वेळात वेळ काढून येथे येण्याला महत्त्व दिले. या ठिकाणचे महान कार्य पाहूनच या ठिकाणी देणगीदारांची संख्या भरपूर आहे त्यांच्या माध्यमातून हुशार मुलांना शिष्यवृत्तीतून प्रेरणा मिळते. असे देणगीदार खरोखरच भाग्यवान आहेत. त्यांचा चांगल्या कामासाठी हातभार लागतो.  या ठिकाणी शिक्षणामुळे कार्याचा सुगंध आहे. आपल्याकडे विचाराची चांगली शिदोरी आहे म्हणूनच ज्ञानरूपी संस्काराचे चांगले पकवान या ठिकाणी बनते. या संकुलात योग्य शिक्षकांची निवड आहे म्हणून शिक्षण, शिस्त या ठिकाणी आहे. प्रत्येकानी आपले जीवन बनवण्यासाठी मदत केली त्यांचे कधीही उपकार विसरायचे नसतात. चांगल्या कामाची पावती म्हणजे आपले होणारे कौतुक असते. सत्कारमूर्ती शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांनी या संकुलातून सूर्यासारख्या ज्ञानाचा प्रकाश देण्याचे कार्य कौतुकास्पद केले आहे. म्हणून आज 79 व्या वर्षानंतर ही चांगले आरोग्य, चांगलो शरीरयष्टी, चेहऱ्यावर तेज, उत्कृष्ट असी प्रज्ञा त्यांच्यामध्ये दिसून येते. त्यांच्या कार्यात उत्तरोत्तर अशीच प्रगती लाभावी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
          सत्कारमूर्ती शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की प्रत्येकानी चांगले विचार ठेवून चारित्र्यवान व संस्कारक्षम बनणे महत्त्वाचे आहे. मला लहानपणापासूनच मित्रमंडळी चांगली भेटली . आपण आपल्या संस्थेतून शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम बनवण्याचे कार्य केले या संस्काराच्या जोरावरच आपण इतरांचा आदर करण्यास शिकले पाहिजे. एकमेकांचा आदर करून केलेले कार्य आदर्श कार्य बनते. आपण आपल्या आई-वडिलांचा गुरूंचा आदर ठेवणे महत्त्वाचे आहे म्हणून संस्काराने मोठे होणे महत्त्वाचे आहे वस्तीगृहात आज पर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना मोफत सोय देऊन शिक्षण देण्याचे कार्य केले. आपल्या संस्थेतून चांगल्या पदावर विराजमान विद्यार्थी आहेत. सर्वांनी आदर करण्यास शिकले पाहिजे तोच आदर, संस्कार जीवनात भविष्य घडविण्यासाठी कामी येतो म्हणून संस्कारक्षम बनुन समाजासाठी कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
       कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा श्री लालासाहेब मगर (उपाध्यक्ष, अखिल भारतीय शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य ) मार्गदर्शन करताना म्हणाले की या शिक्षण संकुलात महान कार्य करणारे शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांच्या जीवनाची सुरुवात कष्टातून जरी झाली असली तरी आजचा दिवशी यांच्या कार्याचे कौतुक पाहायला भेटते. समाजातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या कुटुंबाचा आधार उभा करणारे खरोखरच शिक्षण महर्षी म्हणणे योग्य ठरू शकते. ग्रामीण भागात शिक्षणाचे व्यवस्था करून ते चालवणे सोपे नाही. मात्र या ठिकाणी सर्व कार्य कौतुक करण्यासारखे आहे. त्या संधीचे सोने करणे आवश्यक आहे अशा महान व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असा अपेक्षा व्यक्त केली.    
       प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक भाषण केले ते म्हणाले की दादांनी जीवनात अविस्मरणीय कार्य केले आहे. कोणताही आधार नसताना त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे त्यांना मिळाले. संस्थेच्या स्थापनेपासून पूर्ण इतिहास याप्रसंगी सांगितला संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले प्रत्येक क्षेत्रात चमकत आहेत. यापेक्षा मोठे कार्य काय होऊ शकते. या संस्थेतील तालुका, जिल्हा , राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर ही नावलौकिक होत आहे. अशाच कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही चांगले कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
      संभाजीनगरचे उद्योगपती रणजीत भैय्या चव्हाण हे प्रत्येक वर्षी 11 जुलै रोजी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ विद्यालयात 21 हजार रुपयांची शिष्यवृत्ती वाटप करतात. हरिदास तीर्थकर साहेब हे देखील वस्तीगृहातील 20 मुली व 20 मुले यांना गणेशाचे वाटप करतात. तसेच दोन ज्ञानेश्वरी ग्रंथ  देतात. प्रत्येक वर्षी देणगीदाराकडून जमा होणाऱ्या देणगी मधून इयत्ता पाचवी, इयत्ता आठवी, शिष्यवृत्तीधारक व इयत्ता दहावी व इयत्ता  बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच त्याच देणगेतून विद्यालयातील होतकरू व गरीब 151 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले जाते. विविध स्पर्धेतून जे विद्यार्थी प्रथम द्वितीय व तृतीय येतात त्यांना हे बक्षिसाचे वाटप करण्यात आले. 
        कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा श्री देवीदास पाठक (अध्यक्ष, जिल्हा पत्रकार संघ, धाराशिव, सिनेट सदस्य डॉ आं.म.विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर ) मा श्री लालासाहेब मगर (उपाध्यक्ष, अखिल भारतीय शिक्षण संघ, महाराष्ट्र राज्य )संस्थेचे संचालक रामदास आण्णा कोळगे, संचालक राजनारायण कोळगे, उपस्थित होते.
       ग्रामस्थांच्या वतीने ही सत्कार करण्यात आला. नातेवाईक, मित्रमंडळी यांनीही याप्रसंगी सत्कार केला. 
      दैनिक एकमतचे पत्रकार सुभाष कदम व साप्ताहिक झुंजार कैवारीचे संपादक तेजसिंह कोळगे व शाम गंगावणे उपस्थित होते.  दैनिक एकमत व साप्ताहिक झुंजार कैवारी व वृत्तपत्रकेतून विशेषांकाचे प्रकाशन प्रकाशित करण्यात आले. 
        याप्रसंगी शिक्षण विभागातील असरार सय्यद सर, श्रीमती दैवशाला हाके मॅडम, श्रीमती वाकुरे मॅडम, यरमुडवार सर ,काजी साहेब, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, माजी सरपंच बालाजी कोळगे, प्रशासकिय अधिकारी शिवकन्या सांळुके ,गोपाळ निंबाळकर, पांडुरंग कोळगे, बाबासाहेब कोळगे, मारुती कस्पटे, किरण तीर्थकर, राजेंद्र भनगे, पांडुरंग कोळगे , अभिजीत माने, सदाशिव अण्णा कोळगे, गणपत घोडके, किसन मते, शिवाजी बारगुळे गुरुजी, शिवाजी पवार गुरुजी, पोपट नलवडे गुरुजी, गणपत बप्पा माने, सुब्रराव लोमटे, नानासाहेब कदम, पांडुरंग कोळगे, मारुती कदम अंबेवाडीकर , स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, शिक्षक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश शेटे, सचिन कांबळे तर आभार काकासाहेब डोंगरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या