Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

भारतीय लोकशाहीचा गाभा संविधान- माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे



      भारतीय लोकशाहीचा गाभा संविधान- माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे

          प्रतिनिधी....मनोज जाधव 

रुईभर : - दि 26 नोव्हेंबर रोजी -  भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षता हे संविधानाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानले आहे. आपल्यातील धर्मव्यवस्थेने स्त्रिया, कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी वर्गांना संविधानाने अधिकार दिले. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, लिंग, प्रांत, भाषा यावरून भेदभाव न करता सर्वांना समानता दिली. कायद्याच्या चौकटीतच राहून देशाचा कारभार चालवणे बंधनकारक आहे. यामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायपालिका स्वतंत्र असल्याने बेकायदेशीर कामांना आळा बसुन लोकशाही संविधानाने बळकट होते असे प्रतिपादन जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे संविधान दिन व 26/11 चा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्याच्या संयुक्त कार्यक्रम प्रसंगी माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे कार्यक्रमाच्या अध्यक्षिय भाषणात बोलत होते.

       ते पुढे म्हणाले की भारतीय संविधानात नियम बनून बालमजुरी, वेठबिगारी सारखी गुलामगिरी नष्ट केली. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, आदर संविधानाने मिळवून दिला. सर्व भारतीयांना मतदानाचा हक्क दिला. श्रीमंत असो की गरीब त्या नागरिकांच्या मतांचे मूल्य सारखेच आहे. अनेक जाती धर्म, पंथ, प्रांत, भाषा भौगोलिक विविधता असणाऱ्या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य भारतीय संविधानाने दिले आहे. संविधानाने भारतीयांना सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व सारखी मूल्ये दिले आहेत.

         26/11 सारख्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना म्हणाले की अशा घटना देशासाठी, समाजासाठी घातकच आहेत मात्र अशा घटना होऊ नये म्हणून सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे.

         प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की आपला देश संविधानानुसार चालतो. आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्य त्यात उल्लेखित आहेत. सर्वांना समान अधिकार संविधानाने दिला आहे म्हणून संविधान हे सर्वात श्रेष्ठ मानले आहे. देशाची जडणघडण ही संविधानावर चालते म्हणून सर्वांनी संविधानाचा आदर केला पाहिजे असे वक्तव्य करत 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत ही शहिदांना अभिवादन करत समाज विघातक प्रवृत्तींना कुठेतरी थांबवले पाहिजे कारण यातून देशाची, राज्याची, समाजाची हानी होते. आपणही उच्चशिक्षित होऊन देश हिताचे कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

         कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि प सदस्य रामदास अण्णा कोळगे यांच्या हस्ते संविधान स्विकृती  प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय संविधानांचे सामूहिक वाचन करण्यात आले.

        याप्रसंगी डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.   

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश शेटे तर आभार श्री सचिन कांबळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या