जयप्रकाश विद्यालयाच्या सुयश आडे यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
प्रतिनिधी...मनोज जाधव
रुईभर, दि. ३ डिसेंबर – जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथील इयत्ता ११ वी (विज्ञान शाखा) मधील विद्यार्थी सुयश संजय आडे याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याने विद्यालयात त्याचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, शिक्षण महर्षी श्री. सुभाषदादा कोळगे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने क्रीडा संकुल, बारामती येथे नुकत्याच राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत सुयश आडे यांनी १७ वर्ष वयोगटातील सॉफ्ट टेनिसमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या उत्तुंग यशाच्या बळावर त्याची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून, या स्पर्धा मध्य प्रदेश येथे होणार आहेत.
समारंभात सुयश आडे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमास माजी जि. प. सदस्य रामदास आ. कोळगे, माजी ग्रा. प. सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश शेटे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. सचिन कांबळे यांनी केले.


0 टिप्पण्या