डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य समाज हितासाठी वाहून घेतले : माजी जि प सदस्य रामदास अण्णा कोळगे
प्रतिनिधी...मनोज जाधव
रुईभर : दि ६ डिसेंबर रोजी - महामानव बाबासाहेब आंबेडकरांना क्रांतीसुर्य म्हटले जाते कारण त्यांचे कार्य खरोखरच अतुलनीय आहे. त्यांच्या विचाराची शिदोरी घेऊन जीवन सुंदर व्यतीत करता येते. त्यांच्या कार्याचा जीवनात आदर्श घेऊन समाज हिताचे कार्य करावे. जीवनात संघर्ष करावा लागतो. संघर्ष करताना येणारी आव्हाने स्वीकारून त्याचा सामना करायला शिकले पाहिजे. प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. देशाला सुजलम सुफलम बनवण्याचे कार्य केले आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून कोणत्याही कार्यावर सहज विजय मिळवू शकतो. त्यांनी आपले आयुष्य समाज हितासाठी वाहून घेतले. तसेच आपण ही सामाजिक कार्य करावे अशी अपेक्षा जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात माजी जि प सदस्य रामदास अण्णा कोळगे बोलत होते.
मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ अर्पण करण्यात आले.
प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी प्रास्ताविक भाषणात म्हणाले की महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली म्हणून त्यांना संविधानाचे शिल्पकार म्हणतात. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा आहे त्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन देशोन्नतीचे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
विद्यालयातील सहशिक्षक श्री मोहन चव्हाण यांनी डॉ बाबासाहेबांचा जीवनपट भाषण रूपाने मांडला. त्यानी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे. कष्टकरी श्रमजी वर्गाचे कैवारी होते. समाजात समता, बंधुता यासाठी प्रयत्न केले. त्यांनी स्वतःसाठी घर न बनवता पुस्तकांसाठी घर बांधले त्यांच्या कार्याचे अनुकरण करून जीवन उज्वल बनवण्याची अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
याप्रसंगी डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन कांबळे यांनी तर आभार श्री गणेश शेटे यांनी मानले


0 टिप्पण्या