Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

तुळजापूरात भाविकांची लूट थांबणार का? शिवसेना शिंदे गटाचा संताप उसळला! अनधिकृत पार्किंग वसुलीकर्त्यावर खंडणीचा गुन्हा नोंदवा – मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ...


   
       तुळजापूरात भाविकांची लूट थांबणार का?

शिवसेना शिंदे गटाचा संताप उसळला! अनधिकृत पार्किंग वसुलीकर्त्यावर खंडणीचा गुन्हा नोंदवा – मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ...


      प्रतिनिधी....मनोज जाधव 


तुळजापूर : तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशासह देशभरातून लाखो भाविक दररोज तुळजापूरात येतात. शासनमान्य पार्किंगमध्ये अधिकृत पावती देत व्यवस्थापन केले जाते. मात्र जगदाळे पार्किंग परिसरात शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत काही खाजगी वसूलदारांकडून भाविकांकडून जबरदस्तीने खंडणीसारखी पार्किंग वसुली केली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.


सदर ठिकाणाला शासनाची कोणतीही परवानगी, टेंडर किंवा अधिकृत परवाना नसतानाही खुलेआम लूट सुरू असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला.


🚨 भाविकांकडून ‘खंडणी’सारखी वसुली!


जगदाळे पार्किंग परिसरात येणाऱ्या भाविकांना जबरदस्ती थांबवून पार्किंग शुल्काची वसुली केली जात असून पावतीही रीतसर दिली जात नाही.

यामुळे भाविकांची आर्थिक लूट, मानसिक त्रास आणि तुळजापूरच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


✍️ शिवसेना शिंदे गटाचे कठोर निवेदन


शिवसेनेचे तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले.

निवेदनात अनधिकृत वसुलीकर्त्यावर तात्काळ खंडणीचा गुन्हा नोंदवावा आणि भाविकांची होत असलेली लूट तत्काळ थांबवावी अशी ठाम मागणी करण्यात आली.


जाधव यांनी स्पष्ट इशारा दिला की—

“प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर शिवसेना स्टाईलने भव्य आंदोलन छेडण्यात येईल!”


यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


🔍 प्रशासन काय भूमिका घेणार?


निवेदनाची दखल घेऊन प्रशासन—


भाविकांची लूट थांबवणार का?


अनधिकृत वसुलीकर्त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करणार का?


की त्यांना अभय देणार?



याचा निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. तुळजापूरच्या भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी हे प्रकरण आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या