Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

रुईभर–मेडसिंगा परिसरात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तात्काळ पंचनाम्याची मागणी.....




     रुईभर–मेडसिंगा परिसरात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तात्काळ पंचनाम्याची मागणी.....


 धाराशिव | प्रतिनिधी....मनोज जाधव 




रुईभर व मेडसिंगा परिसरात दिनांक 27 मार्च रोजी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या उभ्या व काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अनपेक्षित पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू यांसह द्राक्ष व आंब्याच्या बागांनाही फटका बसला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास हिरावला गेला आहे.



विशेषतः काढून ठेवलेली ज्वारी पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. रुईभर येथील शेतकरी नानासाहेब पवार यांच्या ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी प्रशासनाकडे तात्काळ मदतीची आर्त मागणी केली आहे. “आधीच संकटात सापडलो आहोत, आता हा पाऊस आमच्यासाठी आणखी घातक ठरला,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


यापूर्वी खरिप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेला होता. रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र अवकाळी पावसाने त्या आशांवर पाणी फेरले आहे.

सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर उत्पन्नाचा कोणताही ठोस स्रोत उरलेला नाही. मुलांचे शिक्षण, आरोग्य तसेच विवाह यांसारख्या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या, असा मोठा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा राहिला आहे.

यामुळे शासन व प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


अवकाळी पावसाच्या या संकटामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला असून तातडीने मदत मिळाली नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे...

     रुईभर येथील शेतकरी नानासाहेब पवार यांच्या काढून टाकलेल्या ज्वारी पिकाचे खूप मोठे नुकसान झाले असून काढून टाकलेली ज्वारी सर्वच्या सर्व खराब झाली असल्याने त्या ज्वारीचा कडबा व ज्वारीचे धान दोन्हीही पूर्णपणे कामाला येणार नसल्याने संपूर्ण वर्षाचे अर्थकारण बिघडले असल्यामुळे शासनाने व प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत भरीव स्वरूपाची मदत करावी अशी आर्त हाक त्यांनी आमच्या प्रतिनिधीच्या व चॅनलच्या माध्यमातून दिली असून आता तात्काळ पंचनामे सुरू होणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या