धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - शहर विस्तारित असलेल्या सांजा रोड परिसरातील शिवरस्ता कामास अनेक वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मंजूर करण्यात आला. या रस्ता कामाचे उद्घाटन आनंद भालेराव व सांजा ग्रामपंचायतचे उपसरपंच सतिश सुर्यवंशी यांच्या हस्ते दि.९ जानेवारी रोजी करण्यात आले.
धाराशिव शहरालगत असलेल्या सांजा रोड परिसरातील उस्मानपुरा चौक, संत गोरोबा काका नगर, सिद्धार्थ नगर, शिवनेरी नगर, तुळजाई चौक, देवा चौक, लक्ष्मी नगर, विठ्ठल नगर, साईश्रद्धा नगर, छत्रपती शिवाजी नगर, टापरे बिल्डिग आदींसह जोडलेले रस्ता हा या भागांतील मुख्य रस्ता आहे. याच मार्गाने येथील रहिवाशांची मुख्य वाहतूक असून या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता शिव रस्ता असला तरी तो धाराशिव नगर पालिकेच्या हद्दीत असल्यामुळे या रस्त्याचे काम मंजूर करून ते सुरू करण्यात यावा अशी मागणी या भागातील नागरिक मागील अनेक वर्षांपासून नगर परिषद प्रशासनाकडे सातत्याने करीत होते. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यासाठी निधीची तरतूद करुन प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे त्या भागातील नागरिकांची मागणी पूर्ण झाली असून या रस्त्याचा अडथळा दूर झाला झाला आहे. या रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बापू काशीद गफूर शेख, निसार शेख, बाप्पा सूर्यवंशी,समीर शेख सांजा ग्रामपंचायत सदस्य राजदीप गायकवाड, शंकर गुडे, मिलिंद चांडगे, प्रवीण जकाते, घाटे गुरुजी, सुधीर कुंभार, धनु मार्डीकर, अनवर शेख, बालाजी पेठे, मुज्जू मुजावर,सद्दाम तांबोळी,अन्वर उर्फ बब्बू शेख, बाळासाहेब माळी, सागर शेळके, पवन दाखले, आदी उपस्थित होते.
अक्षय भालेराव यांचे नागरिकांनी मानले आभार
या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले होते. त्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना चिखलातून पायपीट करावी लागत होती. हा रस्ता नसल्यामुळे लहान बालकांना विशेष शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मात्र हे काम मंजूर करून घेण्यासह प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी अक्षय भालेराव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे हे काम मार्गी लागले. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आल्यामुळे या भागातील नागरिकांनी अक्षय भालेराव यांचे आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या