Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

संजयकुमार डव्हळे यांनी गट अ संवर्गातील अधिकाऱ्यावरील चौकशीसाठी योग्य समिती नेमण्याची मागणी

संजयकुमार डव्हळे यांनी गट अ संवर्गातील अधिकाऱ्यावरील चौकशीसाठी योग्य समिती नेमण्याची मागणी

प्रतिनिधी : मनोज जाधव 

धाराशिव:गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांविरोधातील तक्रारींच्या चौकशीसाठी शासन निर्णयानुसार योग्य अधिकारप्राप्त समिती नेमण्याची मागणी उपजिल्हाधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी केली आहे.

उपजिल्हाधिकारी डव्हळे यांच्यावर चालू असलेल्या चौकशी प्रक्रियेबाबत त्यांनी आज जिल्हास्तरीय समितीच्या अधिकारक्षेत्रावर प्रश्न उपस्थित केला. शासन निर्णय दिनांक १९ सप्टेंबर २००६ नुसार,गट अ किंवा गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या तक्रारींच्या चौकशीसाठी समितीचे अध्यक्षपद विभागीय आयुक्तांकडे राहत असल्याचे डव्हळे यांनी दिलेल्या अर्जात स्पष्ट केले आहे.

त्यानुसार,जिल्हास्तरीय समितीला अशा प्रकारच्या चौकशीचा अधिकार नाही,असे डव्हळे यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे.त्यांनी ही चौकशी विभागीय आयुक्त स्तरावरील समितीकडे वर्ग करावी,अशी विनंती केली आहे.

डव्हळे यांनी दिलेले अर्जात महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयाची प्रत जोडून समितीच्या रचनेबाबतची तरतूद नमूद केली आहे.आपल्या मागणीला आधार देताना,चौकशी प्रक्रियेतील नियमांचे काटेकोर पालन करावे,अशी भूमिका मांडली आहे.

उपजिल्हाधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी या संदर्भातील अर्ज जिल्हाधिकारी,महिला कल्याण अधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना प्रतिलिपी करून दिला आहे. 

आता जिल्हाधिकरी यांनी नेमलेल्या समितीचा अहवाल नेमका काय असेल तसेच या प्रकरणाचा पुढील निर्णय काय होतो,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या