🗳️ प्रतिनिधी...मनोज जाधव
धाराशिव जिल्ह्यात निवडणुकीचा बिगुल
सलगरा-दिवटीतून केदार सौदागरांची धडाकेबाज एन्ट्री!
‘प्रहार’कडून उमेदवारीची करणार मागणी ; राजकारणात खळबळ
धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. तुळजापूर तालुक्यातील सलगरा-दिवटी पंचायत समिती गणाचे आरक्षण ओबीसी (पुरुष) यासाठी जाहीर झाले असून, याच गणातून सलगरा-दिवटीचे सुपुत्र केदार सौदागर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
त्यांच्या या निर्णयामुळे केवळ तालुका नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण केदार सौदागर हे नाव म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झगडणारा चेहरा. त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन केले, तर ऊस कारखान्यांकडे थकलेली बिले वसूल व्हावीत म्हणून कारखान्यांच्या आवारात जाऊन उग्र आंदोलन उभारले. तसेच पीक कर्ज माफीसाठी काढलेला बैलगाडी मोर्चा हे त्यांच्या लढाऊ भूमिकेचे प्रत्यंतर आहे.
फक्त आंदोलनच नव्हे, तर मानवसेवेची परंपराही त्यांनी जपली आहे. मागील पाच वर्षांत केदार सौदागर यांनी वीस ते पंचवीस हजारांहून अधिक रुग्णांना मोफत उपचार सेवा दिली असून, हजारो लोकांना रक्तदान व प्राणदानाच्या उपक्रमांद्वारे मदत केली आहे.
“प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष वंदनीय बच्चुभाऊ कडू माझ्यावर विश्वास ठेवतील आणि उमेदवारी देतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. मी मागील पाच वर्षे जनतेची सेवा केली आहे, आणि तीच सेवा मला विजयाचा गुलाल लावेल,” असे केदार सौदागर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
त्यांच्या या निवडणूक लढविण्याच्या इच्छेमुळे त्या मतदारसंघातील पारंपरिक पक्षांच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे.
आता केदार सौदागर यांची मैदानात एन्ट्री ही भल्याभल्यांची डोकेदुखी ठरणार का? याचे उत्तर येणारा काळच देईल.
---








0 टिप्पण्या