Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

पदवीधर मतदार संघाच्या नाव नोंदणीस सुरुवात


 *पदवीधर मतदार नाव नोंदणीच्या प्रक्रियेस सुरुवात..*

धाराशिव:-छत्रपती संभाजी नगर विभाग पदवीधर मतदार व शिक्षक संघाच्या मतदानाची प्रक्रिया चालू झाली असून पदवीधरांची मतदार नाव नोंदणी फॉर्म भरण्यासाठी तहसील कार्यालय व इतर ठिकाणी ऑनलाईन सह नाव नोंदणी चालू असून राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव येथील सहाय्यक वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत आनंदगावकर यांच्याकडे पदवीधर सौ.साधना गणेश वाघमारे यांचा फॉर्म जमा करून पदवीधर मतदार नाव नोंदणीस सुरुवात केली.पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले,यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा मतदार जनजागरण समितीचे कार्याध्यक्ष गणेश वाघमारे,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव येथील सहाय्यक वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत आनंदगावकर,राजगीर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नागनाथ गोरसे,ऍड.अनुरथ नागटिळक,अंकुश उबाळे,बाबासाहेब बनसोडे,विक्रम गायकवाड,सलार शेख सह इतर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या