पत्रकारांच्या विविध मागण्यांचे पालकमंत्र्याकडे साकडे
मुख्य संपादक.....मनोज जाधव 9823751412
धाराशिव - राज्यातील सर्व पत्रकारच्या प्रश्नांचा विचार करुन व्हॉईस ऑफ मिडिया या देशपातळीवर पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार सरकारी दरबारी आपले म्हणणे सादर करीत आहे. ज्या पत्रकारांना पत्रकारितेत १० वर्षे पुर्ण झाली आहेत,अशा पत्रकारांना अधिस्विकृती कार्ड देण्यात यावे.अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना ई-बसमध्येही सवलत देण्यात यावी,आदींसह विविध मागण्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी व्हॉइस ऑफ मीडियाच्यावतीने एका निवेदनाद्वारे राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दि.२५ जानेवारी रोजी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,अधिस्वीकृती धारक पत्रकारांना रेल्वेची सवलत पूर्ववत सुरू करण्यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न करावेत. तर राज्याच्या माहिती संचलनालयाने शासनाचे पोर्टल तयार करुन त्या पोर्टवलर नव्याने पत्रकारितेत पदवी पुर्ण करुन किमान ३ महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पुर्ण केले आहे.अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे.तसेच राज्यातील अनेक दैनिके,साप्ताहिके व मासिके या वृत्तपत्रांना जाहिराती देताना सातत्याने डावलण्याचा प्रकार पुढे आला आहे.तो प्रकार थांबवून त्यांना जाहिराती देण्यात याव्यात.सर्वांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष तातडीने तयार करावेत.तर पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात आले असून त्याला निधी उपलब्ध करून द्यावा.तसेच या माध्यमातून महामंडळाच्या माध्यमातुन पत्रकार व त्यांचा पाल्यांना व्यवसायासाठी मदत करण्यात यावी.माहिती संचालनालय यांच्यावतीने सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहीत करणारे पुरस्कार गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत,ते देण्यात यावेत.तर टि.व्ही.,रेडिओ आणि सोशल मिडीयात काम करणाऱ्या पत्रकारांना श्रमीक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली आहे.त्याबाबत तात्काळ जी.आर. काढावा.तर अधिस्विकृती कार्ड आणि सेवानिवृत्ती नंतर देण्यात येणारे मानधन याबाबत असणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात याबाबत कमिटी नेमून ज्यांचे प्रस्ताव रखडले आहेत ते मार्गी लावावेत.तर सर्व ठिकाणी वेगाने वाढणाऱ्या आणि भविष्यात पत्रकारितेची नांदी असणाऱ्या सोशल मिडिया पत्रकारीतेसाठी तातडीने जाहिरातीबाबत पॉलीसी बनवावी.तसेच ज्यांनी पत्रकारितेत किमान दोन वर्ष पुर्ण केली आहेत.अशा प्रत्येक पत्रकाराला आणि त्यांच्या कुटूंबियांना सुरक्षा कवच देण्या संबंधिच्या सूचना प्रत्येक नोंदणी असलेल्या माध्यमांच्या मालकांना देण्यात याव्यात,आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे,एज्युकेशन विंगचे राज्याध्यक्ष चेतन कात्रे,महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे,साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते,डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष जुबेर शेख,सरचिटणीस आकाश नरोटे,प्रसिद्धी प्रमुख सलीम पठाण,धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे,सचिव संतोष जाधव,राजाभाऊ वैद्य,बालाजी निरफळ,देविदास पाठक,शीलाताई उंबरे,ज्ञानेश्वर पतंगे,उदय साबळे,सतीश मातने,कैलास चौधरी,सागर जाधव,मनोज जाधव,कुंदन शिंदे,अहमद चांद अन्सारी,असिफ मुलाणी,सज्जन यादव,किशोर माळी,वैभव पारवे,उपेंद्र कटके,किरण कांबळे,प्रमोद राऊत,प्रशांत कावरे,मच्छींद्र कदम,जी बी राजपूत,राजेंद्र जाधव,रहीम शेख,बाबासाहेब आंधळे,बिभीषण लोकरे,अल्ताफ शेख,मुस्तफा पठाण,काकासाहेब कांबळे,कलीम सय्यद व कालीदास म्हेत्रे आदींच्या सह्या आहेत.
0 टिप्पण्या