भविष्य घडवण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही - तेजश्री प्रधान
मुख्य संपादक....मनोज जाधव 9823751412
रुईभर : -दि २५ जानेवारी - स्नेहसंमेलन प्रसंगी मला माझ्या शाळेतील दिवसाची आठवण झाली. आपल्या कार्यक्रमास कोण येणार, कसे असतील त्याची ओढ असते. अशा कार्यक्रमाबरोबरच विद्यार्थी जीवनात अभ्यास करणे आवश्यक आहे. अभ्यासाबरोबर आपल्यातील कला जोपासली पाहिजे. कला जोपासताना रिकाम्या वेळेचा उपयोग करतात मात्र जीवनात कोणत्याही स्थानी जा भविष्य घडवण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन कार्यक्रमाचे आकर्षण तेजस्वी प्रधान सिने अभिनेत्री याप्रसंगी मार्गदर्शन करताना जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व इंदिरा गांधी प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी बोलत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी श्री सुभाष दादा कोळगे होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा सौ अर्चनाताई पाटील - माजी उपाध्यक्ष जि प धाराशिव, मा श्री संताजी चालुक्य - जिल्हाध्यक्ष, भाजप धाराशिव, भगवान गुलाबगिरी महाराज - उपाध्यक्ष डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्था, रुईभर तथा मठाधिपती, मठ संस्थान रुईभर, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी केले. त्यांनी विद्यालयाची उत्तरोउत्तर होणाऱ्या प्रगतीचा आलेख भाषण रूपाने मांडला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा सौ अर्चनाताई पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की अशा कार्यक्रमातून आपल्या कलागुणांना वाव मिळतो. आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळुन अशा गुणांचा विकास विद्यार्थी दशेतच विकसित करावा. शालेय स्तरावर असे कार्यक्रम सादर केले जावेत कारण आपल्या कलागुणांना वाव मिळून जीवनातील एक सुखकर मार्ग मिळण्याच्या संधी उपलब्ध होत असते म्हणून कलागुणांना वाव देऊन जीवन सुखकर बनवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
मा श्री संताजी चालुक्य जिल्हाध्यक्ष भाजपा धाराशिव यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की कोणताही व्यक्ती आवड तेथे सवड काढत असतो. त्याप्रमाणे अर्चनाताई पाटील कामात व्यस्त असताना सुद्धा या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित राहिल्या. अशा कार्यक्रमातून आनंद घेत कार्यक्षम बनण्याची अपेक्षा व्यक्त केली.
वार्षिक स्नेह संमेलनात विविध कलागुणांचा कार्यक्रम मोठ्या थाटात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केला. यामध्ये विविध गीतावर नृत्य सादर केले. समुह नृत्य, कोळीगीत, भावगीत, देशभक्तीपर गीते,भक्तीगीते सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांतील उत्साह हा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत होता. कार्यक्रमात विद्यार्थी नृत्य गायनामध्ये दंग झाले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य जयप्रकाश कोळगे, श्री योहान वसावे, श्री अभिजीत घोळवे, श्री नेताजी धुमाळ व विद्यालयातील सर्व शिक्षक वृंदानी सहकार्य केले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, रूईभरचे माजी सरपंच श्री बालाजी कोळगे , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष कपाळे , प्रवीण पाठक, राजाभाऊ मलबा, नेताजी शिंदे, गुलचंद व्यवहारे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके ,इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक श्री डोंगरे के ए , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा गणेश शेटे श्री सचिन कांबळे, श्रीमती ईश्वरी मोरे यांनी तर आभार प्रा गणेश शेटे यांनी मानले.
0 टिप्पण्या