Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

महात्मा गांधीजीचे कार्य सदैव स्मरणात ठेवून देश सेवा करा - प्राचार्य जयप्रकाश कोळगे

महात्मा गांधीजीचे कार्य सदैव स्मरणात ठेवून देश सेवा करा - प्राचार्य जयप्रकाश कोळगे

मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412

              रुईभर : - दि ३० जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 77 वी ( पुण्यतिथी ) पुण्य स्मरण साजरा करत आहोत. त्यांचे कार्य जगप्रसिद्ध आहे. त्यांचा स्मरण दिन कुष्ठरोग व हुतात्मा दिन म्हणून साजरा होतो. आपल्या देशासाठी महात्मा गांधीजींनी दिलेला नारा चले जाओ महत्वपूर्ण ठरला होता. त्यानी सत्य, अहिंसा मार्गाचा अवलंब करून जगाला एक आदर्श समोर ठेवून दिला. देशाला स्वातंत्र्य करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. आपल्या देशातील कुष्ठरोगांची समस्या त्यावेळेस काळजी करणारी होती. तेव्हा त्यांनी ठरवले की आपला देश कुष्ठरोग मुक्त झाला पाहिजे. आजची स्थिती आपण पाहतोय कुष्ठ रोगांची संख्या अगदी कमी झालेली आहे. देशाचे दुःख आपले दुःख मानणारे महात्मा गांधीजीना सदैव स्मरणात ठेवून देश सेवा करण्याची अपेक्षा प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी जयप्रकाश माध्यमिक व उच्च  माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे महात्मा गांधी स्मरण दिनानिमित्त हुतात्मा दिन व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन दिन साजरा करताना व्यक्त केली.
      कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे  होते.    
      विद्यालयात ठीक ११ वाजता हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना सामुहिक आदराजंली वाहण्यात आली.   
            याप्रसंगी विद्यालयातील सहशिक्षक श्री नेताजी धुमाळ यांनी हुतात्मा दिनाची सखोल माहिती सांगितली. हुतात्मा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलनाची माहिती देत कुष्ठरोगाची लक्षणे स्पष्ट करून त्यावरील उपाय योजनाची सविस्तर माहिती सांगितली .
            महात्मा गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा इतिहास भाषण रूपाने मांडला. गांधीजी वरती लहानपणापासूनच संस्कार झाले होते. त्यामुळे देशाविषयी असलेल्या आत्मीयतेमूळे विदेशातून  मायदेशी परतले व स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले. स्वातंत्र्यलढ्यात अहिंसात्मक मार्गाचा अवलंब केला. हीच  विचारधारा प्रभावशाली होऊन भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी मदत झाली.
         स्वातंत्र्यासाठी  देश प्रेम वीरांनी केलेला त्याग, दीनदुबळ्यांची सेवा, चांगले विचार घेऊन भारताच्या प्रगतीचा  सर्वानी वसा घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
        याप्रसंगी माजी जि प सदस्य श्री रामदास आण्णा कोळगे , माजी ग्रा प सदस्य श्री रामनारायण कोळगे , प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या सांळुके , इंदिरा गांधी प्रा शाळेचे मु अ श्रीनानासाहेब शेलार , शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा गणेश शेटे यांनी तर आभार श्री डोंगरे के ए यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या