Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आमदार प्रवीण स्वामी यांना दिव्यांगाच्या अडचणी संदर्भात देण्यात आले निवेदन


अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आमदार प्रवीण स्वामी यांना दिव्यांगाच्या अडचणी संदर्भात देण्यात आले निवेदन

मुख्य संपादक....मनोज जाधव 9823751412

उमरगा :दि.३०/०१/२०२५ रोजी दिव्यांगांच्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक समस्या असल्या कारणाने अनेक दिव्यांग तसेच कुष्ठरोग अशा व्यक्तींचे आधार कार्ड अपडेट होत नाहीत, अनेक दिव्यांग शासकीय योजनेपासून वंचित आहेत,केवळ आधार कार्ड अपडेट होत नसल्या कारणाने शासण दरबारात हेलपाटे मारावे लागत आहेत.शासनाने एक विशेष समिती गठीत करून अशा व्यक्तींचे त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या समस्यांवर तोडगा काढला पाहिजे.सविस्तर माहिती आमदार प्रवीण स्वामी यांना देण्यात आली.निवेदनात खालील प्रमाणे मागण्या केल्या असून १) दिव्यांगांना प्रति महिना ६००० पेन्शन देण्यात यावी.  २) ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर परिषद याठिकाणी दिव्यांगांना राजकीय आरक्षण देण्यात यावे.३) भूमिहीन बेघर दिव्यांगांना घरकुल मंजूर करण्यात यावे.४) सार्वजनिक ठिकाणी व सरकारी कार्यालये अडथळा विरहित करणे.५) दिव्यांगांना शासकीय नोकरीत सुट देण्यात यावी.६) व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी.७) १० लाखांची आरोग्य विमा पॉलिसी सरकारने काढावी. ८) उत्पन्नाची मर्यादा १ लाखांपेक्षा जास्त करावी ९) कुष्ठरोग आणि ज्यांना हाता पायाची बोटे नाहीत अशांना आदोगरपासूनची पेन्शन देण्यात यावी.अशा १९ मागण्यांसाठी निवेदन उमरगा -लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांना देण्यात आले.यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, ईसाक शेख, Adv.इनामदार ,महावीर पाटील,रामेश्वर मदने, धनराज माने, सुदर्शन जाधव, सोनबा सुर्यवंशी,खाजामिया शेख आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या