Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणून भारतीय संविधानाची ओळख - शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे

जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणून भारतीय संविधानाची ओळख - शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे 

मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412

       रुईभर : - दि 26 जानेवारी रोजी - देश कोणत्याही एका विशिष्ट घराण्याचा, जातीचा, धर्माचा नाही. भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षता हे संविधानाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानले आहे. आपल्यातील धर्मव्यवस्थेने स्त्रिया, कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी वर्गांना संविधानाने अधिकार दिले. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, लिंग, प्रांत, भाषा यावरून भेदभाव न करता सर्वांना समानता दिली. कायद्याच्या चौकटीतच राहून देशाचा कारभार चालवणे बंधनकारक आहे. यामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायपालिका स्वतंत्र असल्याने बेकायदेशीर कामांना आळा बसतो.
        सृजनशील वर्ग आहे त्यात लेखन करणारे, संशोधन, प्रबोधन करणाऱ्यांना पूर्वी त्रास देत असत. अशा सर्जनशील पूर्वजांना व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिले. भारतीय संविधानात नियम बनून बालमजुरी, वेठबिगारी सारखी गुलामगिरी नष्ट केली. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, आदर संविधानाने मिळवून दिला. सर्व भारतीयांना मतदानाचा हक्क दिला. श्रीमंत असो की गरीब त्या नागरिकांच्या मतांचे मूल्य सारखेच आहे. अनेक जाती धर्म, पंथ, प्रांत, भाषा भौगोलिक विविधता असणाऱ्या देशाला एक एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य भारतीय संविधानाने दिले आहे. संविधानाने भारतीयांना सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व सारखी मूल्ये दिले आहेत म्हणून जगात सर्वात मोठी राज्यघटना म्हणून भारतीय संविधानाची ओळख आहे  असे प्रतिपादन भारत देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रूईभर येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर 24 तास काम करत आपण विद्यार्थी दशेत आठ तास तरी अभ्यास करावा. अभ्यास करण्याने आपली बौद्धिक क्षमता वाढते. कमी कष्टात अधिक काम करण्याचे ज्ञान मिळते. अभ्यास केला तर आपल्यातील मानवी गुनांचा विकास होतो. आपल्यातील प्रामाणिकपणा विकसित झाला पाहिजे. प्रामाणिकपणामुळे आपल्यावर खोटं बोलण्याची किंवा खोटे काम करण्याची वेळ येणार नाही म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास वृत्ती व प्रामाणिकपणा जोपासवा अशी अपेक्षाही व्यक्त केली
      सकाळी ठीक ७:४५ वाजता विद्यालयात माजी जि प सदस्य रामदासआण्णा कोळगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यालयाच्या प्रांगणात शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
      कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाचे वाचन तनुजा ढेरे हिने केले.
       विद्यालयात प्रजासत्ताकाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात प्राविण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
          माजी जि प सदस्य श्री रामदासआण्णा कोळगे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात येण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना प्राण द्यावे लागले. आजही आपल्या शेजारी असणारे राष्ट्र त्रास देत आहेत. विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडण्यासाठी पुढे आले पाहिजे. विद्यार्थी हे उद्याचे आधारस्तंभ असतात. चांगलं भविष्य घडवण्यासाठी व देशाची शान वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
          प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनीही मार्गदर्शन करताना म्हणाले की तिरंगा आपल्या देशाची शान आहे. तिरंगा झेंड्या बद्दल सखोल माहिती सांगितली. घटना समिती, मसुदा समिती कशा स्वरूपाचे काम करत होत्या व संविधान अमालबजावणीचा इतिहास मार्मिक भाषेत सांगितला. जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे. घर घर संविधान मोहिमेबद्दल मार्गदर्शन केले.
         प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की प्रजासत्ताक दिन हा आनंदाचा आणि अभिमानाचा सण आहे. स्वतंत्र देशाचा राष्ट्र कारभार कसा असावा हे पाहिलेले स्वप्न संविधानाच्या रूपाने पूर्ण झाले. लोकशाही बद्दल सखोल माहिती सांगितली. विविधतेने नटलेल्या देशाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी योग्य असे संविधान दिले.
   .   याप्रसंगी माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक श्री डोंगरे के ए, शिवाजी पवार गुरुजी, ह भ प पांडुरंग आप्पा कोळगे, एकनाथ महाराज, बाबासाहेब कोळगे (चेअरमन ) , पोपट पाडुळे, राजाभाऊ भणगे, श्री विकास क्षिरसागर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन कांबळे व अभिजीत घोळवे यांनी तर आभार गणेश शेटे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या