समाज उन्नतीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज - प्राचार्य जयप्रकाश कोळगे
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
रुईभर : -दि 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्याची सुरुवात अगदी लहानपणापासूनच केली होती. मोजके सैन्य घेऊन लढा देण्यासाठी युद्धनीतीचा वापर करून अष्टपैलू कर्तत्वाची माहिती समजून येते. समाजामध्ये उन्नती आवश्यक असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे असे प्रतिपादन जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुईभर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 395 जयंती साजरी करताना प्राचार्य जयप्रकाश कोळगे बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले की पाठीमागील इतिहास नवीन पिढीच्या समोर आला पाहिजे कारण अशा जयंतीच्या माध्यमातून पुर्वजांनी केलेल्या कार्यातून प्रेरणा मिळत असते. राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना महाभारत, रामायण या पुराणातील गोष्टी त्यांच्यात बिंबवल्या. तो काळ म्हणजे समाजावर होणारे अन्याय पाहावत नव्हते त्या अन्यायाला दूर करण्याची दूरदृष्टी ठेवून राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुसंस्कारीत केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठावान मावळे बनवले त्यांचा आदर्श घेऊन त्यांचे विचार आत्मसात करावेत त्यांचे गुण आपल्यात उतरावेत. इतिहास वाचणारेच इतिहास बनवत असतात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी श्री सुभाष दादा कोळगे होते.
माजी जि प सदस्य श्री रामदास अण्णा कोळगे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगात शौर्याच्या गाथा गायल्या जातात त्यांचे कार्य खरोखरच अनुकरणीय आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे उदाहरण देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली त्यांच्याकडे धनसंपत्ती कमी असले तरी जीवनात जीवाला जीव देणारे मावळे होते तसेच आपण एक गरीबीतून पुढे जाऊन आपल्या कार्यातून नावलौकिक करावा आपण ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारून जीवन उज्वल बनवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रा गणेश शेटे यांनी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना म्हणाले की आपले प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांनी अगदी बालपणापासूनच मावळे जवळ करून आपल्या स्वराज्याची मुहूर्त वेळ रोवली. त्यांच्या कार्याची करावी तेवढे कौतुक कमी आहे. त्यांच्या प्रत्येक कार्याची पद्धत वाखानण्यासारखी आहे. त्यात गनिमी कावा ही लढण्यासाठी यशस्वी पद्धती ठरली. शिवाजी महाराजांचा पन्हाळा गडावरील प्रसंग वर्णन करताना त्यांच्या शौर्याची गाथा भाषण रूपाने मांडली . गनिमी काव्याचा वापर करून पावनखिंडीत तीनशे मावळे तीन हजार दुश्मनाच्या सैनिकांशी लढा देण्यासाठी गनिमी काव्याचा वापर अगदी कुशलतेने करून त्यांच्या शौर्याचा प्रसंग याप्रसंगी व्यक्त केला. असेच संघर्षाचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा आपण कुशलतेने संकट हाताळून जीवन उज्वल बनवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी जयप्रकाश विद्यालयाचे विद्यार्थ्यां , इंदिरा गांधी प्राथमिक शाळा व लिटल चॅम्पच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाविषयी आपले विचार भाषण, गीत गावून व्यक्त केले.
याप्रसंगी माजी ग्राप सदस्य श्री राजनारायण कोळगे , श्री स्वामी समर्थ कला विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब शेलार , पर्यवेक्षक श्री डोंगरे के ए, श्री क्षीरसागर व्ही बी , शिक्षक वृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री घोळवे ए बी तर आभार , श्री माने ए टी यांनी मानले.
0 टिप्पण्या