जि. प. प्रा. शाळा बरमगाव बू येथे शिवजयंती उत्साहात साजरी
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
धाराशिव : तालुक्यातील बरमगाव बू येथे महाराष्ट्रा चे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जि. प. प्रा. शाळा बरमगाव बू येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी शालेय शिक्षण समिती चे उपाध्यक्ष बळीराम सिरसाठे यांच्या हस्ते
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्प हार घालून मिरवणूकीस सुरुवात झाली. शाळेतील शिक्षक विजयकुमार फरताडे सर यांनी मागील 10 दिवस अथक परिश्रम करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
या मिरवणुकीत शाळेतील विध्यार्थ्यांनी लेझीम व झाँज पथक च्या माध्यमातून शिवाजी महाराज यांचा जीवन पट थोडक्यात मांडला. विविध खेळ शिवकालीन मर्दानी खेळ दाखवून गावकर्यांची मने जिकंली.
ही रॅली शाळेत आल्या नंतर प्रथम विस्ताराधिकारी शिंदे मॅडम यांचा हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजा करण्यात आली. बळीराम सिरसाठे यांनी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. त्या नंतर शाळेतील विध्यार्थ्यांनीं शिवचरित्रावर भाषण केली.
एन एम एस परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार विस्तार अधिकारी शिंदे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला
ग्रामसमृद्धी सामाजिक संस्थे च्या वतीने सर्व विध्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, व शिवाजी कोण होता हे पुस्तक बक्षीस म्हूणन देण्यात आले.
जय भवानी तरुण गणेश मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच शोभा ताई बाळकृष्ण गोरे, शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा मिरताई घोडके, उपाध्यक्ष बळीराम सिरसाठे, शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर, धडाडीचे कार्यकर्ते श्री सुरेंद्र घोडके,
ग्राम समृद्धी सामाजिक संस्थे चे उपाध्यक्ष अमर आगळे व अभिमान जाधव, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, बचत गटाच्या महिला, शाळेचे माजी विद्यार्थी, विविध समित्याचे सदस्य,शाळेतील सर्व शिक्षक,ग्रामपंचायत सदस्य व लहान मुळे यांचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन श्री फरताडे सर यांनी केले. व आभार शिंदे मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
0 टिप्पण्या