युवा भिमसेना व सुरेख सुंदर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे आरपीआयचे नवीन जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांचा सत्कार..
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
धाराशिव :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी विद्यानंद बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल युवा भीमसेना व सुरेख सुंदर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व पेढे भरून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या जागेत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमात आरपीआय जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी युवा भीमसेनेचे महादेव भोंसले व सुरेख सुंदर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे श्रीकांत गायकवाड, पृथ्वीराज चिलवंत,सुनील ढगे फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे गणेश वाघमारे,संजय गजधने प्रवीण जगताप,सोमनाथ गायकवाड,अतुल लष्करे स्वराज जानराव,कुमार गायकवाड, बनसोडे,सनी धावारे,वसीम,बाळु शिंदे, जेटीथोर सह इतर उपस्थित होते.सत्कार केल्या बद्दल आरपिआय आठवले गटाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या