सांची प्रतिष्ठानच्या वतीने आरपीआय आठवले गटाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांचा सत्कार..
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
धाराशिव :- धाराशिव जिल्हा रिपब्लिकन आॅफ इंडिया आठवले गटाच्या जिल्हाध्यक्ष पदी विद्यानंद बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल सांची प्रतिष्ठान धाराशिवच्या वतीने पुष्पकांत माळाळे,संग्राम बनसोडे,प्रमोद हावळे यांनी शाल टोपी,पुष्प बुके व पेढे भरवुन सत्कार करण्यात आला.विद्यानंद बनसोडे यांचे कार्य पाहता धाराशिव जिल्हाची जिल्हाध्यक्ष म्हणुन त्यांच्या वर पक्षाने जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यांच्या निवडी बाबत सर्वत्र त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत,सांची प्रतिष्ठान सामाजिक चळवळीत अग्रेसर असुन विद्यानंद बनसोडे यांना शुभेच्छा देतांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद हावळे यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला.प्रमुख उपस्थिती आरपिआयचे जाॅईण्ट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ,रणजीत गायकवाड होते तर पुष्पकांत माळाळे, संग्राम बनसोडे, प्रमोद हावळे अन्य इतर उपस्थित होते.
0 टिप्पण्या