जल सप्ताह विविध उपक्रमाने साजरा करा.. गणेश वाघमारे
मुख्य संपादक...मनोज जाधव...9823751412
जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांचे निवेदन.
धाराशिव :- दरवर्षी दि.22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो,या अनुषंगाने दि 16 मार्च ते 22 मार्च हा जल सप्ताह साजरा करण्यात येतो,या सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत जल जागृती होण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते तथा आंदोलक गणेश रानबा वाघमारे यांनी लेखी निवेदन दिले आहे,यात म्हण्टले की,सध्या पाण्याची कमतरता असून भर उन्हाळा जाणवत आहे,पाण्याचा वापर काटकसरीने करण्यात यावा, पाण्याविषयीची जनजागृती व्हावी यासाठी दैनिक, मिडीया,आकाशवाणी टीव्ही चॅनल,पथनाट्य आणि मार्गदर्शक व्याख्याते यांच्याकडून पाण्याविषयीची जनजागृती करावी या सप्ताहामध्ये राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पा विषयीची माहिती देऊन हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे हे देखील पटवुन द्यावे. शासकीय सभागृहात दोन दिवसांचे माहिती चित्र प्रदर्शन भरविण्यात यावे.
या सप्ताहामध्ये जलजागृती साठी कार्यक्रम राबवून नागरिकांना त्याचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करावे तर कडक उन्हाळा सुरू असुन बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व प्राथमिक आरोग्य किटची व्यवस्था करण्यात यावी,अशी मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते तथा आंदोलक, राष्ट्रीय नदी जोड प्रकल्प गणेश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी यांना नायाब तहसिलदार ज्योती चौहान यांच्याशी चर्चा करुन देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या