Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जि.प.केंद्रिय प्राथमिक शाळा नांदुरी येथे प्रवेश दिंडीचे भव्य आयोजन

जि.प.केंद्रिय प्राथमिक शाळा नांदुरी येथे प्रवेश दिंडीचे भव्य आयोजन

     महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा धाराशिव यांच्यावतीने व तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष.                श्री बाळकृष्णजी तांबारे सर यांच्या नेतृत्वाखाली तर जिल्हा संघाचे अध्यक्ष श्री संतोष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व  जिल्हा परिषदेचे CEO श्री. मैनकजी घोष साहेब, जि.प‌.चे शिक्षणाधिकारी श्री अशोकजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 

  *जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढावी या उद्देशाने

गुढी पाडवा पट वाढवा

हे अभियान राबविण्यात येत आहे, या अभियानाअंतर्गत आज *दि.18/03/2025 रोजी  अंगणवाडी शाळेतील बालकांचे पुष्पवृष्टी करत , चॉकलेट, पुष्पगुच्छ देऊन ढोलताशांच्या गजरात, टाळ्यांच्या निनादात भव्य स्वागत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर गावातप्रवेश दिंडी काढण्यात आली. गावातील नागरिक, पालक यांनी दिंडीचे आयोजन केल्याबद्दल स्वागत केले.

   याप्रसंगी शाळेचे प्रमुअ. श्री.मुकूंद शेटे, जेष्ठ शिक्षक श्री. मोहन पौळ, श्रीम. विद्या भोसले, श्रीम. पार्वती मुकरे मॅडम, श्री.महादेव गायकवाड सर, श्री. रोहन गोंगाणे, कबिर  सलगर, अंगणवाडी ताई श्रीम. केशर मुळे, श्रीम. सुलोचना गाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन श्री. महादेव गायकवाड सर यांनी केले व आभारप्रदर्शन श्री. शेटे सर यांनी केले. शाळेच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या