धाराशिव जिल्ह्यात वाघ व बिबट्यांचा धुमाकूळ...
राघुची वाडी येथे गाईवर हल्ला....
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
मागील तीन महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यात वाघ धुमाकूळ घालत असून या वाघाला पकडण्यात वन विभागाला अद्यापही यश आले नसून....
धाराशिव शहरालगत घटनेत वाढ
काल रात्री धाराशिव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राघूची वाडी येथील शंकर पाटील यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाईवर अज्ञात प्राण्याने हल्ला केला असून तो हल्ला नेमकं वाघाणे केला का बिबट्याने केला हे मात्र समजून आले नाही ...
पंचनामा नेमकं मेलेल्या जनावरांचा का स्वतःच्या अस्तित्वाचा...न उलगडलेले कोडे...
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी
घटनास्थळाला भेट दिली असून पंचनामा करण्याचे काम नेहमीप्रमाणे करण्यात आले परंतु अचानक होत असलेल्या या जंगली प्राण्यांच्या हल्ल्याने शेतकरी मात्र पुरते हवालदिल झाले असून तात्काळ वाघाला पकडावे अन्यथा आमची सर्व जनावरे मेल्यानंतर वाघ पकडण्यात वन विभागाला यश येईल का हे मात्र शेतकऱ्यांना मोठे कोडे पडले आहे.....
शेतकरी वर्गात मात्र घबराट
वाघाला पकडण्यात वन विभागाला मात्र यश मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमधून दबक्या आवाजात एकच चर्चा ऐकावयास मिळत आहे की वाघ आणि वन विभाग यांच्यामध्ये कदाचित आय लव यू तर झाले नसेल ना....
वाघाचे शतक साजरे ?
वाघाणे मात्र आत्तापर्यंत त्याच्या हल्ल्यात शंभर पेक्षा जास्त जनावरांचा जीव घेतला असून तो सरळ सरळ वन विभागाला आव्हान देत आहे की मी शतक पार केले आहे व अजूनही मी मैदानात उभाच आहे
0 टिप्पण्या