शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उद्योजक संतोष वाडेकर यांचा करण्यात आला सत्कार......
प्रतिनिधी... शहाजी आगळे
धाराशिवच्या उद्योजकाने स्वकर्तुत्वाने कोरले महाराष्ट्राच्या पटलावर आपले नाव...
धाराशिव तालुक्यातील सकणेवाडी येथील अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थितीमध्ये मसाला उद्योगात उतरलेले व आपले स्वतःचे धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रात अस्तित्व निर्माण केलेले उद्योजक संतोष वाडेकर यांच्या उद्योगाची दखल घेऊन त्यांना नाशिक येथील रिसेल डॉट इन समाचार वाणी न्यूज यांच्याकडून दिला जाणारा उद्योजकता पुरस्कार 2025 हा जाहीर झाला व त्याप्रमाणे त्यांना यथोचित मानसन्मान देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले......
ही गोष्ट मेडशिंगा येथील शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर साळुंखे यांच्या लक्षात आले असता आपल्या जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या उद्योजकाचा आपणही सन्मान केला पाहिजे यासाठी त्यांनी मौजे मेडशिंगा येथे उद्योजक संतोष वाडेकर यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल यथोचित सन्मान केला..तसेच त्यांचे सहकारी श्री अमर साळुंखे यांचाही सत्कार करण्यात आला.... यावेळी मेडशिंगा गावचे सरपंच श्री अनुरथ दूधभाते, भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष श्री काकासाहेब शेलार, सोसायटीचे चेअरमन श्री तुकाराम रणदिवे तसेच व्हाईस चेअरमन श्री महादेव आगळे, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमास दत्ता रणदिवे रमन आगळे महेश लांडगे रमाकांत जाधव सूर्यकांत कदम देविदास रोहिले धनाजी शित्रे यांच्यासह गावातील शेकडो नागरिक हजर होते...
गावातील तरुणांना प्रोत्साहन मिळविण्यासाठी राबविला अनोखा उपक्रम
यावेळी बोलताना किशोर साळुंखे यांनी सांगितले की सत्कार करण्या पाठीमागे गावातील तरुणांना प्रोत्साहन मिळावे व त्यामधून गावाचे नाव उज्वल करणारे उद्योजक घडावे यासाठी हा सत्कार केले असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.....
0 टिप्पण्या