सकनेवाडीचे उद्योजक संतोष वाडेकर हे महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराने सन्मानित...
प्रतिनिधी...शहाजी आगळे
*सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान*
धाराशिव तालुक्यातील सकनेवाडी येथील अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थितीमध्ये मसाला उद्योगात उतरलेले व आपले स्वतःचे संपूर्ण महाराष्ट्रभर अस्तित्व निर्माण केलेले संतोष वाडेकर(डुकरे) यांच्या साई समृद्धी फूड प्रॉडक्ट्स या मसाला निर्मिती उद्योगाला नाशिक येथे (दि२१) सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्र उद्योजकता हा देऊन सन्मानित करण्यात आले.
नाशिक येथील रिसेल डॉट इन आणि समाचार वाणी न्यूज यांच्या कडून दिला जाणारा महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५ हा सर्व सामान्य व कमी कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या साई समृद्धी फूड प्रॉडक्टस ने प्रसिद्धीस आल्यामुळे संतोष वाडेकर(डुकरे) याना देण्यात आल्या मुळे त्यांचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या