Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

रक्तदानात जयप्रकाश कोळगे यांची हाफ सेंच्युरी कडे वाटचाल...


रक्तदानात जयप्रकाश कोळगे यांची हाफ सेंच्युरी कडे वाटचाल

प्रतिनिधी....शहाजी आगळे 

प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी 44 वेळा रक्तदान केले
     रुईभर : - दि 27 मार्च रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुईभर येथील प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी 44 वेळा रक्तदान केले.    

रक्तदानाला वाहून घेतलेला अवलिया प्राध्यापक

      प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. मात्र दुसऱ्यांच्या गरजा ओळखून व सामाजिक बांधिलकी समजून केलेले कार्य महान असते.रक्तदान हे एक मौल्यवान आणि जीवन रक्षक कार्य आहे. कुठेही रक्तदान शिबिर असो त्यावेळेस रक्तदान करणे हा त्यांचा अठ्ठास असतो कारण कोणत्या वेळेस कोणाला मदत होईल व कोणाला जीवनदान मिळेल म्हणून रक्तदानाचे महत्त्व ओळखून आज 44 व्या वेळी डॉ दिग्गज दापके - देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करण्याचा योग आला. डॉ दिग्गज दापके - देशमुख यांचा सामाजिक विविध उपक्रमात सहभाग असतो. यामध्ये शिशुपालन कार्यासारखी कामे समाजासाठी वरदान ठरत आहेत. एवढेच नाही तर वयोवृद्ध व्यक्तींच्या कर्णबधीर समस्याचे महत्व ओळखून त्यांनी ऐकू येण्यासाठी कित्येक वयोवृद्धांना मशीनचे वाटप करण्याचे महान कार्य केले आहे.  त्यामुळे त्यांच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या