विवेक नवोदय क्लासेसमध्ये नवोदय धारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा...
धाराशिव प्रतिनिधी ...शहाजी आगळे
विवेक नवोदय क्लासेस धाराशिव आयोजित नवोदयधारक विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पालकांशी हितगूज साधण्याच्या हेतूने धाराशिव येथिल आई लाॅन्समध्ये विवेक नवोदय क्लासेसने विद्यार्थी माझे सांगाती पर्व 1 ले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले प्रा.श्री. अनिलजी आहेर सर, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. कुंडलीकजी पवार सर, श्री. दिनकर माळी सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरसत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लासेसचे सर्वेसर्वा, संचालक प्रा. सागर माळी सर यांनी केले. माळी सर हे उच्चशिक्षित, स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी असून येथिल काजळा गावचे रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या मनोगतात क्लासेसची यशोगाथा मांडली. यानंतर *नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेत शहरी भागातून पात्र ठरलेला क्लासेसचा पहिला नवोदयधारक विद्यार्थी शौर्य अशोक शिंदे* या विद्यार्थ्यी व पालकांचे 2501/- रु.रोख बक्षीस शाल, श्रीफळ, फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. तसेच क्लासचे 7 star असलेले
कु. ईश्वरी पवार, काव्या जाधवर, शौर्य कोरे, शिवम शेळके, रुद्र सूर्यवंशी, श्रेयस अंधारे, मेधांश वाकुरे या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ व 501/- रुपये बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालकांनी व विद्यार्थ्यांनी विवेक नवोदय क्लासेस यांनी घेतलेली मेहनत व विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले यश याबद्दल ॠण व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिवव्याख्याते , धाराशिव येथिल मोटीवेटर श्री. विशालजी सुर्यवंशी सर यांनी केले. 5 वी नवोदय शिष्यवृत्ती परिक्षा व 8 वी NMMS व शिष्यवृत्ती परिक्षेसाठी पुढील काळात भरीव कामगिरी करण्याचा मनोदय आयोजकांनी व्यक्त केला. मान्यवर व उपस्थितांचे आभार श्री. महादेव गायकवाड सर यांनी मानले. कार्यक्रमासाठी दारफळचे भूमिपुत्र, तुळजाभवानी हॉटेल मॅनेजमेंटचे संचालक प्रा.महेश इंगळे सर यांच्या विशेष सहकर्याबद्दल आयोजकांनी आभार मानले. श्री. किसन जावळे, श्री. गुणवंत साळुंके, श्री.प्रशांत गायकवाड, श्री. बापू काळे सर, श्री. विठ्ठल निचळ ,श्री. ढोणे सर, श्री. वैभव हाजगुडे, सतिश जाधवर सर श्री. कोरे सर, , काजळा गावातील शिक्षणप्रेमी नागरिक, आप्तेष्ट मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर माळी सर श्री. राहूल माळी सर, श्री. महादेव गायकवाड सर व मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 टिप्पण्या