सुरज जयपाल जाधव यांचा बेस्ट फार्मर पुरस्कार व सरपंच बालाजी कोळगे यांच्या वाढदिवसानिमित्त जयप्रकाश विद्यालयात सत्कार सोहळा संपन्न
रुईभर (ता. धाराशिव) : जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे दिनांक 10 मार्च रोजी भव्य सत्कार सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात श्री सुरज जयपाल जाधव यांचा बेस्ट फार्मर पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य श्री बालाजी सुभाष कोळगे यांच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते श्री सुरज जाधव आणि श्री बालाजी कोळगे यांचा शाल, हार व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
बेस्ट फार्मर पुरस्काराने सुरज जाधव सन्मानित
श्री सुरज जाधव यांना नागपूर येथील वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेतर्फे "बेस्ट फार्मर" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या कार्यक्रमास भारतातील सहा राज्यांतील शेतकरी उपस्थित होते.
या प्रसंगी माजी जि. प. सदस्य श्री रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके, विठ्ठल कोळगे, नागनाथ कोळगे, किरण तीर्थकर, आप्पा लोमटे, बालाजी धुमाळ, सोपा निंबाळकर, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक श्री डोंगरे के. ए., शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन कांबळे यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री गणेश शेटे यांनी मानले.
0 टिप्पण्या