विद्यार्थी सलग १४ तास अभ्यास करून महामानवाला अभिवादन करणार...
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
धाराशिव: भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदराने अभिवादन करण्यासाठी विद्यार्थी सलग १४ तास अभ्यास करणार आहेत. या उपक्रम बद्दल माहिती सांगतांना श्री साई श्रध्दा एज्युकेशनचे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे म्हणाले सलग १४ तास अभ्यास करणे एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम आहे. या उपाक्रमाद्वारे, आपण भारतरत्न, महामानव व अखंड विद्यार्थी राहिलेले डॉ. आंबेडकरांच्या विचारांना आणि कार्याला आदराने व गौरव अभिवादन करणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान समाजसुधारक, विचारवंत आणि संविधान निर्माते होते. त्यांनी आपल्या कार्यामुळे समाजातील अन्याय आणि विषमतेविरुद्ध लढा दिला, तसेच शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या जीवनात अभ्यासाला खूप महत्त्व होते आणि ते स्वतः १८ तास अभ्यास करत असत. त्यामुळे आपण विद्यार्थी म्हणून १४ तास अभ्यास करणे हा एक प्रकारे त्यांच्या कार्याला आदराने अभिवादन करण्याचा एक चांगला मार्ग आहे. या उपक्रमाद्वारे, विद्यार्थी आणि इतर लोक डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी जोडले जातात आणि त्यांच्या कार्याचा प्रभाव त्यांच्यावर होतो. या उपक्रमामुळे, समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढते आणि अन्याय व विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा मिळते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणात साजरी होत असताना आपण विद्यार्थी म्हणून दिवसभरात सलग १४ तास अभ्यास करा व या महामानवाला अभिवादन करा. आपण अभ्यास करतानाचा फोटो आम्हाला ९४२२९४१९२९, ७४४७२४७८७१, ९४०४५२९६३७ व ९४०३३५७८७१ या क्रमांकावर पाठवून या महामानवाला अभिवादन करण्याच्या कार्यात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवा.
0 टिप्पण्या