जिल्हा नियोजन समितीला वशीकरण करून जिल्ह्याच्या विकासाचे वासे उलटे फिरवणाऱ्या ओएसडी वर कार्यवाही होणार का ?
प्रतिनिधी...शहाजी आगळे
कार्यवाहीवर सर्व जिल्ह्याचे लागले लक्ष...
धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीत करोडो रुपयांचा निधी वाटप करत असताना पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा मी ओ एस डी आहे असे खोटे सांगून धाराशिव जिल्ह्यातील गुत्तेदारांकडून टक्केवारी घेऊन पालकमंत्र्याच्या परस्पर जिल्हा नियोजन समिती मधील निधी वाटप करणाऱ्या त्या तथाकथित ओएसडीवर कार्यवाही होणार का ? अशी चर्चा कंत्राटदार वर्गातून सध्या दबक्या आवाजात सुरू आहे...
जिल्हा नियोजन समिती मधील अधिकारी तरी यात सामील नसतील का ?.....
जिल्हा नियोजन समितीतून पालकमंत्र्याच्या संमती विना परस्पर निधी वाटप झाला खरा परंतु एवढी मोठी रक्कम वाटप होत असताना तो तथाकतीत ओएसडी टक्केवारी घेत असेल तर त्यात जिल्हा नियोजन समिती मधील अधिकारी सुद्धा सामील कशावरून नसतील अशीही चर्चा सध्या जिल्हाभरात होत असून त्या तथाकथित ओएसडीवर कार्यवाही होत असताना जिल्हा नियोजन समितीतील अधिकारीही कार्यवाहीच्या चक्रात अडकणार का त्यांना कोणाचे अभय मिळून ते यातून सही सलामत सुटणार असाही सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे...
जिल्हा नियोजन समिती दलालांचा अड्डा तर बनत नाही ना ?
जर अधिकारी वर्ग यात सहभागी असतील तर जिल्हा नियोजन समिती मधील निधी वाटपात दलालांचा सुळसुळाट व त्यांचा वावर नक्कीच असणार आहे त्यामुळे जनतेमधून एक प्रश्न विचारण्यात येत आहे की जिल्ह्याचा विकास करणारी जिल्हा नियोजन समिती मधील अधिकारी टक्केवारी घेऊन निधी तर वाटप करत नसतील त्यामुळे जिल्हा नियोजन समिती मध्ये दलालांचा एक अड्डा तर बनत नाही ना अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.....
0 टिप्पण्या