जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडशिंगा यांच्यावतीने चावडी वाचन कार्यक्रम संपन्न..
प्रतिनिधी...शहाजी आगळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडसिंगा या शाळेत आज दिनांक पाच एप्रिल 2025 रोजी "*निपुण महाराष्ट्र अभियान* "अंतर्गत *चावडी वाचन* हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री कृष्णाजी लाकाळ हे लाभले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मेडसिंगा गावचे उपसरपंच श्री किशोरजी आगळे यांची उपस्थिती लाभली.
इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा चावडी वाचन उपक्रम ग्रामपंचायत मेडशिंगा या ठिकाणी साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेतील एकूण 72 विद्यार्थ्यांचा समावेश दिसून आला. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री सचिन साळुंखे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार व्हि.के. ,वर्ग शिक्षक बदाले सर ,सतीश साळुंखे सर ,श्रीम अडसुळे मॅडम आणि पत्रकार श्री मनोज जाधव या सर्वांचे कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
या उपक्रमासाठी बीट शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शिंदे मॅडम व रुईभर सी.पी.एस. चे केंद्रप्रमुख दुधंबे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांनी मराठी इंग्रजी वाचन करून दाखवले त्यावर गावातील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपसरपंच ,सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी शाळेला प्रोत्साहन दिले.मुख्याध्यापक पवार सर यांनी कार्यक्रमच्या शेवटी सर्वांचे आभार मानले.
0 टिप्पण्या