जयप्रकाश विद्यालयास दोन लाखाचा धनादेश प्राप्त
रुईभर :- दि 21 मे रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर ता. धाराशिव यांना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल 2,00,000 रु . (अक्षरी दोन लाख रु.) धनादेश प्राप्त झाला आहे.
सन 2024-25 महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाद्वारे जयप्रकाश माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाने तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावल्या मुळे रोख रकमेचा दोन लाख रुपये धनादेश विद्यालयास प्राप्त झाला असून यामुळे या रकमेतून विद्यालयाच्या भौतिक सुविधा वाढण्यास हातभार लागणार आहे.
आज रोजी डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांच्याकडून प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांच्याकडे दोन लाखाचा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे. सदरील रक्कम प्राप्त झाल्याने परिसरातील नागरिकात व कर्मचाऱ्यात उत्साहाचे वातावरण आहे.
याप्रसंगी माजी जि प सदस्य रामदास अण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके , पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या