जयप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयाचा १००% निकाल...
मुख्य संपादक ...मनोज जाधव 9823751412
रुईभर :जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथील उच्च माध्यमिक विद्यालयाचा १००% निकाल लागला असून यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
विज्ञान शाखेचा १००% व कला शाखेचा ९८% निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत प्रथम श्रेणीत ५८, द्वितीय श्रेणीत ९८ , तृतीय श्रेणीत ०२ विद्यार्थी आले आहेत. कला शाखेतील प्रथम श्रेणीत ७९ , द्वितीय श्रेणीत ५२ विद्यार्थी आले आहेत.
विज्ञान शाखेत प्रथम धनश्री जाधव ८८.६७%, द्वितीय प्रज्ञा मरगणे ८४.५०%, तृतीय अनुष्का काटवटे व समीक्षा मुंडे ८३.१७% गुनाने क्रमे आलेल्या आहेत. कला शाखेतील प्रथम स्नेहा रणशिंगे ८२.६७%, द्वितीय फिजा शेख ८२.५०%, तृतीय मोहिनी रणशिंगे ८१.६७% गुणांनुक्रमे आलेल्या आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते पुष्प माला घालून सत्कार करण्यात आला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी जि प सदस्य रामदास अण्णा कोळगे, माजी ग्राप सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके, पर्यवेक्षक श्री काकासाहेब डोंगरे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रशांत कोळगे तर आभार प्रा नानासाहेब पवार यांनी मानले.
0 टिप्पण्या