Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

प्रा. सोमनाथ लांडगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्कार जाहीर....


प्रतिनिधी....मनोज जाधव 


धाराशिव येथील शैक्षणिक व सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले श्री साई श्रध्दा एज्युकेशन नीट ऑनलाईन टेस्ट सीरिजचे संचालक तसेच बील गेट्स जुनिअर काॅलेजचे प्राचार्य प्रा. सोमनाथ लांडगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अमरावती येथील अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दि. 11 जून 2025 रोजी क्षितिज पॅलेस, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक, अमरावती येथे समारंभ पुर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्र संस्थेच्या सचिव सौ. माधुरीताई चव्हाण यांनी दिले आहे.

   याच कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सुध्दा होणार असून "मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीत पालकांचे योगदान " या विषयावर प्रा. सोमनाथ लांडगे यांचे व्याख्यान होणार आहे. या सकाळी 9:00 ते 4:00 पर्यंत दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमात अनेक मान्यवर शैक्षणिक विषयावर आपले विचार मांडणार आहेत. 

या कार्यक्रमास खा. बळवंत  वानखेडे, आ. सुलभाताई खोडके, लेडी गव्हर्नर कमलताई गवई, पोलीस उपायुक्त गणेशजी शिंदे, राष्दवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत डावरे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातील जनसंपर्क अधिकारी डाॅ. मनिष गवई, साहित्यिक विष्णुसिंह सोळंकी, प्राचार्य दिलीप काळे, अतुल गोळे व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


   शैक्षणिक क्षेत्रात सतत नवनवीन प्रयोग करुन मेडिकल कॉलेज प्रवेश पुर्व परिक्षा अर्थात नीट परीक्षेत आपला नवीन पॅटर्न तयार करून अनेक गोरगरीब व वंचित मुला-मुलींना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यात यशस्वी झालेले व धाराशिव शहरात श्री साई श्रध्दा एज्युकेशन मार्फत अत्यंत कमी फीस मध्ये मुलींचे वसतीगृह, अर्थिक अडचणीत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलींना शैक्षणिक फीस भरण्यास मदत असे अनेक शैक्षणिक करत असलेल्या प्रा. सोमनाथ लांडगे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनेक जणांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या