Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांचा शिवसेनेकडून सत्कार सोहळा संपन्न


 प्रतिनिधी....मनोज जाधव 


धाराशिव : धाराशिव उपविभागाचे नवे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी नुकतेच पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना तुळजापूर तालुक्याच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा सत्कार कार्यक्रम उपविभागीय कार्यालयात पार पडला असून, त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


या प्रसंगी शिवसेना तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने श्री. देशमुख यांची भेट घेतली. यावेळी तालुक्यातील प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक व्हावे, तसेच जनतेच्या अडचणींना प्राधान्य देत निर्णय घेण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


शिष्टमंडळात शिवसेना शहरप्रमुख दत्तोबा भोसले उर्फ बापुसाहेब, शेतकरी सेना तालुका प्रमुख गणेश नेपते, उपशहरप्रमुख रमेश काका चिवचिवे, नितीन मस्के, संजय लोंढे, भुजंगदादा मुकेरकर, मोहनदादा भोसले आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.


सत्काराला उत्तर देताना उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी सर्वांचे आभार मानत, “धाराशिव उपविभागातील प्रशासन अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी माझे कार्यालय सदैव खुले राहील,” असे आश्वासन दिले.


या कार्यक्रमामुळे प्रशासन आणि जनतेत संवादाची सुरुवात अधिक सकारात्मक झाली असून, नव्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या