प्रतिनिधी ....मनोज जाधव
अमरावती— राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांनी माजी मंत्री ओमप्रकाश (बच्चू) कडू यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने शेतकरी आणि दिव्यांगांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
या निवेदनावर आधारित निर्णय पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला:
1. शेतकरी कर्जमाफीबाबत — पुढील १५ दिवसांत उच्चस्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल. तसेच, जुने थकीत कर्ज वसुली तात्पुरती स्थगित करण्यात येणार असून नवीन वाटपाबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाईल.
2. दिव्यांग मानधन वाढ — दिव्यांग व्यक्तींच्या मानधन वाढीचा निर्णय येत्या ३० जूनपूर्वीच्या अर्थसंकल्पात समाविष्ट केला जाईल.
3. संपूर्ण मागण्यांचा विचार — सदर विषयांवर मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांसमवेत बैठक घेऊन मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.
हा निर्णय शेतकरी व दिव्यांगांसाठी दिलासा देणारा ठरणार असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल अशी आशा व्यक्त केली
0 टिप्पण्या