प्रतिनिधी ....मनोज जाधव
कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या वरद हस्ताने कृषी सेवा केंद्राचे मालक मालामाल....
राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत तूर मूग उडीद व सोयाबीन 100 % अनुदानावर वाटप योजने अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना ऑनलाइन करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय धाराशिव यांच्या वतीने मोठा गाजावाजा करत सदरील योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले त्या आव्हानाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन केले खरे परंतु आज संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थिती पाहता प्रत्येक शेतकऱ्यामागे दुकानदाराकडून 20 ते 25 किलो बियाणे कमी देण्यात येत असून सदरील योजनेअंतर्गत एक हेक्टरी 75 किलो बियाणे शासनाकडून मोफत अनुदानावर देण्यात येणार होते परंतु 75 किलो बियाणे दुकानदारांना पोहोच झाले सुद्धा मात्र दुकानदारांकडून सदरील शेतकऱ्याला कमीत कमी 15 व जास्तीत जास्त 25 किलो बियाणे कमी देण्यात येत असून हे सर्व प्रकार दुकानदार उघडपणे करत आहेत यासाठी आमच्या प्रतिनिधीने तालुका कृषी अधिकारी श्री जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांना सदरील शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारी कानावर घातले असताना सुद्धा तालुका कृषी अधिकारी श्री जाधव यांच्याकडून कसल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाहीत परंतु त्यावरही दुकानदारांची मनमानी सुरू असून उघडपणे शेतकऱ्यांची लूट केली जात आहे दुकानदारासाठी तालुका कृषी अधिकारी यांचा वरदहस्त ठरत असल्याचे दिसून येत आहे तसेच आज जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी श्री रवींद्र माने यांना सुद्धा कार्यालयाने वेळेत प्रतिक्रिया घेण्यासाठी दोन वेळेस फोन केला असता फोन उचलला नाही


0 टिप्पण्या