Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परवाना संपलेला असताना धाराशिव महसूल प्रशासनाच्या डोळ्यात मुरुम फेकत उत्खनन सुरूच

 


प्रतिनिधी ....मनोज जाधव 


धाराशिव - तुळजापूर लातूर महामार्गावर असणाऱ्या काक्रंबा उड्डाणपुलाच्या कामासाठी अवैध उत्खनन सुरू असल्याबाबत वृत्तमालिका सुरू असताना कंत्राटदाराची मुजोरी थांबताना दिसत नाही.या कामासाठी अवैध उत्खनन तर झालेच मात्र कारवाई टाळण्यासाठी मोजक्या परवानग्या मागच्या तारखेत परवानग्या घेतल्याचा संशय तर आहेच मात्र मागच्या तारखेत घेतलेल्या परवानगीची देखील तारीख संपलेली असताना पुन्हा उत्खनन सुरू असल्याने हे उत्खनन प्रशासनाच्या नाकावर टिच्चून केले जात आहे.

                      

                      परवाना संपलेला पुरावा




महसूल प्रशासन कार्यवाही करण्यात असमर्थ त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण....


ज्या गटातून उत्खननाची परवानगी काढली आहे त्याशिवाय इतर ठिकाणांहूनही उत्खनन केले गेले आहे. मात्र आजतागायत या प्रकरणात तहसिलदार, जिल्हा खणीकर्म अधिकारी यांनी कोणतीच कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही. जिल्हाधिकारी देखील या प्रकरणात शांत असल्याने नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय तर झालाच मात्र त्या मोबदल्यात जे स्वामित्वधन मिळणार होते त्यावर देखील पाणी सोडावे लागत असून शासनालाच प्रशासनातील अधिकारी करोडोंचा चुना लावत असल्याचे बोलले जात आहे. तलाठी ते जिल्हाधिकारी सगळेच  या प्रकरणात असल्याने महसूल विभागाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी निःपक्ष स्वतंत्र यंत्रणा उभी केल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे.


     महसूल प्रशासनातील नेमका आका कोण ?


करोडो रुपयाचा गुत्तेदाराकडून शासनाला महसूल बुडवत चुना लावला जात असून त्याला मदत करणारा महसूल प्रशासनातील तो बडा अधिकारी कोण आहे अशी चर्चा दबक्या आवाजात जनतेमधून करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या