रुईभर : -दि ५ जुन रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे कै. व्यंकटेशजी( आबा )हंबीरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते कै व्यंकटेशजी ( आबा ) हंबीरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफल अर्पण करण्यात आले.
डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्था व आबा यांचे संस्था स्थापनेपासुन अतुट संबंध होते. रुईभर येथे हायस्कुल सुरू करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे संस्थाचालवण्यास ही बळ आले. प्रत्येक आडचणी सोडवण्यासाठी अग्रेसर असत. आबांच्या सहकार्यामुळे व संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांच्या प्रयत्नामुळे छोट्या रोपट्याचे वटवृक्षामध्ये रुपांतर झाले आहे. आज छोट्याशा खेडयामध्ये पदवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था झाली आहे.
विद्यालयातील सहशिक्षक श्री नेताजी धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते फेटा, शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी जि प सदस्य श्री रामदास आण्णा कोळगे, माजी ग्राप सदस्य श्री राजनारायण कोळगे, रुईभरचे माजी संरपच बालाजी कोळगे , प्रशासकिय अधिकारी श्रीमती शिवकन्या सांळुके, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्रा शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब शेलार , श्री तानाजी कोळगे , पर्यवेक्षक श्री काकासाहेब डोंगरे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा गणेश शेटे यांनी मानले.


0 टिप्पण्या