Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

कळंब तहसील कार्यालयाने माणुसकी जपत सुट्टीच्या दिवशीही रुग्णाला दिले रेशन कार्ड उपलब्ध करून....


 

         प्रतिनिधी....शहाजी आगळे.....


         पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार अमरावती येथे ट्रेनिंग मध्ये असतानाही व आज बकरी ईदची सुट्टी असतानाही अवघ्या दहा मिनिटात रुग्णाच्या मदतीला आल्या धावून....


त्याचे झाले असे की कळंब तालुक्यातील सातेफळ येथील 72 वर्षाच्या आजीबाईंना पाय मोडल्याने धाराशिव शहरातील बाराते एक्सीडेंटल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले त्यांना ऑपरेशन साठी येणारा खर्च मोठा असल्याने महात्मा फुले योजनेमधून लाभ घेण्यासाठी व सदरील ऑपरेशन मोफत करून घेण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना रेशन कार्ड मागितले परंतु त्यांच्याकडे रेशन कार्ड नसल्याने योजनेमधून ऑपरेशन करणे अडचणीचे ठरू लागले त्यावेळी त्या हॉस्पिटलचे डॉक्टर श्री विकास बाराते यांनी रुग्णसेवक मनोज जाधव यांना सदरची अडचण फोनवरून सांगितले असता रुग्णसेवक मनोज जाधव यांनी कळंब तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार सौ शिल्पा मालवे यांना फोन करून सदरची अडचण सांगितले असता नायब तहसीलदार मॅडम यांनी स्वतः आज तहसील कार्यालयाला सुट्टी असतानाही व त्या अमरावती येथे ट्रेनिंग मध्ये असतानाही रुग्णासाठी अवघ्या दहा मिनिटात रुग्णसेवक मनोज जाधव यांच्या हाकेला प्रतिसाद देत अवघ्या दहा मिनिटात शिधापत्रिका उपलब्ध करून दिली त्यामुळे त्या बहात्तर वर्षांच्या आजीबाईंचे ऑपरेशन योजनेमधून करण्याचा मार्ग मोकळा झाला यावेळी त्या आजीबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव आणि डोळ्यातील अश्रू मात्र पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार शिल्पा मालवे मॅडम यांना आशीर्वाद देत असल्याचे दिसून आले...


         यापूर्वी कळंब तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार सौ शिल्पा मालवे मॅडम यांनी आजपर्यंत शेकडो रुग्णांना अशीच तत्परता दाखवत कागदपत्र उपलब्ध करून दिली आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या