Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

शिवसेना सदस्य नोंदणीला तुळजापूरात उत्स्फूर्त प्रतिसाद;नूतन तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वात संघटना मजबूत करण्याचा निर्धार


 प्रतिनिधी....मनोज जाधव 


तुळजापूर : शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी तुळजापूर येथे नव्याने नियुक्त झालेले तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली भव्य सदस्य नोंदणी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात तुळजापूर शहरासह तालुक्यातील अनेक युवकांनी उत्साहाने सहभाग घेत शिवसेनेचे अधिकृत सदस्यत्व घेतले.


अमोल जाधव यांची दोन दिवसांपूर्वी तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी थेट जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत, कार्याची सुरुवात केली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी शेतकऱ्यांच्या अनुदानावर खते देण्यात येते या संदर्भातील तक्रारींची गांभीर्याने दखल घेत जिल्हा कृषी अधिकारी रविंद्र माने यांच्याकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या ठाम भूमिकेचा सकारात्मक संदेश पोहोचला.



श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आर्य चौक येथून या सदस्य नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमात १०० ते १५० युवकांनी नव्याने सदस्यत्व घेतल्याची माहिती देण्यात आली. अमोल जाधव यांनी यावेळी सांगितले की, ही केवळ सुरुवात असून पुढील काळात संपूर्ण तालुक्यातील गावागावांत,तांड्यावस्त्यांवर जाऊन शिवसेनेची सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.


या कार्यक्रमात तुळजापूर शहराध्यक्ष बापूसाहेब भोसले, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश नेपते, उपशहरप्रमुख काकासाहेब चिवचिवे, नितीन मस्के, मोहनदादा भोसले, भुजंगदादा मुखेडकर, विक्रम कदम, संजय लोंढे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी सहभाग नोंदवला होता.


तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांच्या जोमदार नेतृत्वामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांच्या या एकजुटीमुळे तुळजापूर तालुक्यात शिवसेना नव्या उमेदीने उभी राहत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या