Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सेवानिवृत्तीनंतर समाजसेवा करावी - शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे


   प्रतिनिधी....मनोज जाधव 

      रुईभर : -दि 9 जुलै रोजी - सेवानिवृत्तीनंतर समाजसेवेसाठी कार्य करणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या विद्यालयातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान झाले काही सेवानिवृत्त झाले आहेत. सेवेत असताना अगदी मनोभावे सेवा करतो व सेवानिवृत्तीनंतर अगदी समाजासाठी काम करणे हा सुद्धा सेवाभावच ठरेल. या सर्व सत्कारमूर्तींचा विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर आदर्श ठेवून अभ्यास करावा, मोठे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा, संस्कारक्षम बना, उच्च पदावर विराजमान होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या विद्यालयात असे कार्यक्रम ठेवण्याचे कारण म्हणजे अशा सत्कारमूर्तीचे अनुभव आपल्यासमोर ठेवून आपण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे महत्त्वाचे ठरेल. आपणही असेच सत्कार पात्र बनावे अशी अपेक्षा जयप्रकाश माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे सेवानिवृत्ती व वैद्यकीय शिक्षण परिपूर्ती सत्कार समारंभ प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे बोलत होते. सेवानिवृत्त व वैद्यकीय शिक्षण परिपुर्ती यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

      याप्रसंगी सेवानिवृत्त श्री उद्धव सांगळे (उपशिक्षणाधिकारी व अधीक्षक वर्ग - २ , जि प धाराशिव ) श्री अरुण माडेकर, (मुअ , स्वामी रामानंद तीर्थ विद्यामंदिर, धाराशिव ), ह भ प श्री तानाजी भोईटे ( वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग, धाराशिव ) श्री गुरुनाथ चव्हाण, ( वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग, डॉ रणजीत सिंह कोळगे ब BAMS , डॉ ऋतुजा कोळगे (BDS, यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

         कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मठाधिपती, मठ संस्थान रुईभर चे माननीय श्री भगवान गुलाबगिरी महाराज, माननीय रामदास आण्णा कोळगे, ( संचालक, डॉ आंबेडकर बालविकास शिक्षण संस्था, रुईभर) श्री राजनारायण कोळगे, (संचालक, डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्था रुईभर) लाभले होते.    

            कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री रामदास आण्णा कोळगे यांनी प्रस्ताविक भाषण केले. सर्व सेवानिवृत्त सन्माननीय यांच्या कार्याची प्रशंसा करत आजचे विद्यार्थी भविष्यात देशाचे आधारस्तंभ असतात म्हणून असे कार्यक्रम ठेवले जातात. विद्यालयातून शिक्षण घेऊन उच्च पदी विराजमान होऊन सर्वसामान्य व्यक्तीच्या कामी आले पाहिजे. काम असे करा की आपल्या कामाची प्रशंसा झाली पाहिजे. विद्यार्थ्यात मूल्य रुजणे आवश्यक आहेत. विद्यालयात ज्ञानाबरोबरच संस्कार रुजणे महत्त्वाचे आहे. आपण जीवनात चांगले काम करून नावलौकिक करावा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.

       सत्कारमूर्ती श्री उद्धवजी सांगळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की माझा आणि या संस्थेचा चाळीस वर्षाचा संपर्क आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव अनुभवास भेटतात मात्र विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावी पर्यंतच जीवनात कायापालट करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे . जीवनात हाच कालावधी महत्त्वाचा असतो. अशा संस्थेतून संस्कार रुजवले जातात. आपण सर्वांनी जीवन उज्वल बनवण्यासाठी परिश्रम करण्याची अपेक्षा व्यक्त  केली.

       याप्रसंगी ह भ प तानाजी महाराज भोईटे, ( वनरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग, धाराशिव ) माजी मु अ अरुण माडेकर, (माजी मुअ स्वामी रामानंद तीर्थ विद्यामंदिर, धाराशिव ) डॉ रणजीतसिंह कोळगे (BAMS), डॉ ऋतुजा कोळगे (BDS)यांनीही मनोगत व्यक्त केले.   

        याप्रसंगी प्राचार्य जयप्रकाश कोळगे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके , प्राचार्य संतोष कपाळे, नानासाहेब शेलार, पांडुरंग कोळगे, ह भ प शिवाजी बारगुळे गुरुजी, शिवाजी पवार गुरुजी, श्री पोपट नलावडे गुरुजी, श्री आगतराव भोईटे, सदाशिव कोळगे, ह भ प जगन्नाथ महाराज गव्हाणे, प्रकाश भणगे, पोपट पाडुळे, शेख गुरुजी, सूर्यकांत काकडे, नारायण वडवले, महादेव पवार, आत्माराम कोळगे, सुरज जाधव, राजेंद्र गव्हाणे, राजेंद्र भनगे, अशोक माळी, दत्तू भंडारकर, शिवाजी कचरे, विश्वनाथ माळी, दत्तात्रय बनसोडे, अशोक सिरसाठे, दिलदार खोंदे, हरिदास गव्हाणे, चंद्रकांत सुरवसे , पंडित जगताप, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गणेश शेटे व आभार श्री सचिन कांबळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या