Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

रुग्णांच्या मदतीला धावून जाणारा रुग्णसेवक केदार सौदागर


 "रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा" — केदार सौदागर यांची मदतीची माणुसकीची भावना


प्रतिनिधी...मनोज जाधव...


धाराशिव : रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून केदार सौदागर यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे उमरेगव्हाण येथील भागवत सदाशिव पाटील यांना वेळेवर उपचार मिळाले. अचानक चक्कर आल्याने पाटील यांना सुविधा हॉस्पिटल, धाराशिव येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्या दोन्ही किडनीमध्ये पू झाल्याचे निदान झाले व तातडीने ऑपरेशन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.


या उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत त्यांना समाविष्ट करण्याची गरज होती. केदार सौदागर स्वतः बाहेर गावी असतानाही त्यांनी धडपड करून धाराशिव तहसिल कार्यालयात संपर्क साधला. पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार अमोल बाहेकर यांनी तत्काळ मदत करत कार्ड उपलब्ध करून दिले.


या उपचार प्रक्रियेत सुविधा हॉस्पिटलचे किडनी तज्ञ डॉ. यादव सर, डॉ. पाटील सर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. केदार सौदागर यांनी याबाबत सर्वांचे आभार मानले असून ही सेवा अनाहूतपणे घडली असल्याचे नमूद केले.


केदार सौदागर यांची ही मदत व सेवाभाव, खरंच “माणुसकी अजून जिवंत आहे” याचे उदाहरण ठरते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या